Syed Mushtaq Ali Trophy 2025 Arjun Tendulkar Opening For Goa : आयपीएलच्या आगामी हंगामाआधी मुंबई इंडियन्सच्या संघातून बाहेर पडत लखनौचा झालेला अर्जुन तेंडुलकर सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत गोवा संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. देशांतर्गत टी-२० स्पर्धेत यंदाच्या हंगामातील पहिल्या लढतीपासून गोवा संघाने त्याला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात २८ धावांवर अडखलला अर्जून तेंडुलकरनं चंदिगडविरुद्धच्या सामन्यातही गोवा संघाच्या डावाची सुरुवात केली. पण तो धावबाद होऊन माघारी फिरला. फलंदाजीत चमक दाखवण्याची दुसरी संधीही त्याने गमावल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स
फलंदाजीत धावबाद झाल्यामुळे अपयशी ठरलेल्या अर्जुन तेंडुलकर याने गोलंदाजीतील पहिल्या स्पेलमध्ये २ षटकात ५ धावा खर्च करत दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. अर्जुन तेंडुलकर याने चंदीगडचा कर्णधार शिवम भांब्री याला त्याने अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. त्यानंतर अर्जुन आझाद याला त्याने ७ धावांवर पायचित केले.
पहिल्या सामन्यात बॅटिंग-बॉलिंग दोन्हींत फेल
उत्तर प्रदेश विरुद्धच्या पहिल्या लढतीत अर्जुन तेंडुलकरच गोवा संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसला होता. शिवम मावीनं त्याला भुवनेश्वर कुमारकरवी झेलबाद केले होते. या सामन्यात त्याने ४ चौकाराच्या मदतीने २२ चेंडूत २८ धावांची खेळी केली. गोलंदाजीत २.२ षटकात त्याने २९ धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या फ्लॉप शोसह गोवा संघाची स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली. पण दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत अल्प धावांवर परतल्यावर त्याने गोलंदाजीत हवा केली. फलंदाजीत ९ चेंडूचा सामना करताना ३ खणखणीत चौकार मारून १४ धावांवर तो धावबाद झाला. बॅटिंगमधील कसर भरून काढताना पहिल्या दोन षटकात त्याने २ विकेट्स घेतल्या.
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले...
या संधीचं सोन केलं तर...
अर्जुन तेंडुलकर हा बॉलिंगसह बॅटिंगमध्ये धमक दाखवण्याची क्षमता दाखवणारा खेळाडू आहे. रणजी स्पर्धेत गोवा संघाकडून त्याने शतकी खेळीही केली आहे. IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याला फारशी संधी मिळाली नव्हती. IPL मध्ये नवा संघ मिळाल्यावर देशांतर्गत टी-२० स्पर्धेत त्याला बॅटिंगमधील धमक दाखवण्याची मोठी संधी मिळाली आहे. या स्पर्धेत खास छाप सोडून तो लखनौच्या प्लेइंग इलेव्हनमधील आपली दावेदारी भक्कम करू शकतो.
गोवा संघाकडून ललितचा धमाका!
आतापर्यंत अर्जुन तेंडुलकर हा लोअर मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना दिसला होता. एका बाजूला तो सलामीला संधी मिळून मोठी खेळण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या बाजूला लोअर मिडल ऑर्डरमध्ये ललित यादवनं धमका केला. चंदीगड विरुद्धच्या सामन्यात ललित यादवनं ४९ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या दोरावर गोवा संघाने निर्धिरात २० षटकात ६ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारल्याचे पाहायला मिळाले.