Join us

Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!

पाकच्या तक्रारीनंतर सूर्यानं ICC कार्यालयात हजेरी, सुनावणी झाली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 22:08 IST

Open in App

Suryakumar Yadav's Hearing On PCB's Complaint :  आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील साखळी फेरीतील लढतीपासून वादग्रस्त गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या. पाक विरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण टाळलं. हा मुद्दा मुद्दा चांगलाच गाजला. या प्रकरणात पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणीही केली होती. जर त्यांना हटवले नाही तर आम्ही खेळणार नाही, असा पवित्रा घेऊन ते पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार याच्या वक्तव्यावर आक्षेप यासंदर्भात ICC कडे तक्रार केली होती. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पाकच्या तक्रारीनंतर सूर्यानं ICC कार्यालयात हजेरी, सुनावणी झाली, पण...

पाकिस्तानच्या तक्रारीसंदर्भातील सुनावणीसाठी सूर्यकुमार यादव याने ICC कार्यालयात हजेरी लावली होती. मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांच्या अध्यक्षतेखाली शिस्तभंग प्रकरणातील पाकच्या तक्रारीवर सुनावणी झाली. पण निकाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी २६ सप्टेंबरला यासंदर्भातील त  निकाल समोर येणार आहे. सूर्याला फक्त वॉर्निंग देऊन सोडण्यात येणार की, दंडात्मक कारवाईला सामोरे जावे ते या निकालानंतर स्पष्ट होईल. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर पहलगाम हल्ल्यासंदर्भातील वक्तव्य करुन सूर्यकुमार यादवनं क्रिकेटच्या मैदानातून राजकीय भाष्य केले, असा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला होता.

Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या सविस्तर

पाकच्या ताफ्यातील हारिस राउफ अन् साहिबजादा यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

BCCI नंही पाकिस्तानच्या ताफ्यातील हारिस राउफ आणि साहिबजादा फरहान यांच्याविरोधात ICC कडे  तक्रार केली आहे. साहिबजादा याने टीम इंडियाविरुद्ध अर्धशतक झळकावल्यावर गन सेलिब्रेशन केले होते. याशिवाय हारिस राउफनं सीमारेषेवर हातवारे करून विमान पाडल्याचा इशारा करत भारतीय चाहत्यांना डिवचण्याचा असभ्य कृती केली होती. एवढेच नाही तर शुबमन गिल आणि अभिषेक शर्माला  तो नडल्याचे पाहायला मिळाले होते. याप्रकरणात त्यांच्यावर काय कारवाई होणार तेही फायनलआधी स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Suryakumar Yadav faces ICC hearing after PCB complaint: Final decision pending?

Web Summary : Suryakumar Yadav attended an ICC hearing after Pakistan complained about his comments. A decision is expected soon, potentially impacting his Asia Cup final participation. Haris Rauf and Sahibzada also face scrutiny for on-field conduct.
टॅग्स :आशिया कप २०२५एशिया कपभारत विरुद्ध पाकिस्तानसूर्यकुमार यादव