रोहित शर्माच्या फिटनेसवर बोलणाऱ्यांना सूर्यकुमार यादवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला- तुम्ही जर...

Suryakumar Yadav on Rohit Sharma Fitness: काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी रोहितला 'लठ्ठ' म्हणत नशिबाने कर्णधारपद मिळालेला खेळाडू म्हटले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:44 IST2025-03-07T16:40:19+5:302025-03-07T16:44:02+5:30

whatsapp join usJoin us
Suryakumar Yadav shuts down talk on Rohit Sharma fitness after Congress Shama Mohammad controversy | रोहित शर्माच्या फिटनेसवर बोलणाऱ्यांना सूर्यकुमार यादवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला- तुम्ही जर...

रोहित शर्माच्या फिटनेसवर बोलणाऱ्यांना सूर्यकुमार यादवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला- तुम्ही जर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Suryakumar Yadav on Rohit Sharma Fitness: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या चर्चेत आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. टी२० वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप, टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा चार बड्या ICC स्पर्धांमध्ये भारतीय संघाला अंतिम फेरी गाठून देणारा रोहित शर्मा हा जगातला पहिलाच कर्णधार ठरला आहे. मात्र सध्या तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी रोहितला लठ्ठ म्हणत नशिबाने कर्णधारपद मिळालेला खेळाडू म्हटले. त्यावरून शमा यांच्यावर टीका झाली. तशातच सूर्यकुमार यादवने रोहितच्या फिटनेसबाबत मत मांडले आहे.

"तुम्ही जर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत बोलत असाल तर गेल्या चार वर्षात त्याने चार बड्या स्पर्धांमध्ये संघाला फायनलमध्ये पोहोचवले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. जर एखादा खेळाडू १५-२० वर्षे क्रिकेट खेळत असेल तर ते खूपच खास आहे. फिटनेसचे रोहितच्या जीवनात काय महत्त्व आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. मी त्याची दिनचर्या अगदी जवळून पाहिली आहे. तो आपल्या फिटनेसवर खूप कष्ट घेत असतो. माझ्या मते, रोहित शर्मा सध्या कर्णधार म्हणून सर्वोत्तम आहे. त्याला आणि भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभेच्छा," अशा शब्दांत सूर्यकुमार यादवने रोहित शर्माबाबत रोखठोक मत मांडले.

काय म्हणाल्या होत्या शमा मोहम्मद?

शमा मोहम्मद यांनी ट्विट करत म्हटले होते की, खेळाडू म्हणून रोहित शर्मा लठ्ठ आहे आणि तो भारताचा प्रभावहीन कर्णधारदेखील आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. त्याच्या आधी आलेल्या गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव, शास्त्री आणि इतरांच्या तुलनेत तो खूपच सामान्य आहे. तो एक सामान्य कर्णधार आणि एक सामान्य खेळाडू आहे, ज्याला नशिबाच्या भरवशावर भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले.

दरम्यान, रोहित शर्मावर टीका करणाऱ्या शमा मोहम्मद यांना सध्या भरपूर टीकेचा सामना करावा लागतोय.

Web Title: Suryakumar Yadav shuts down talk on Rohit Sharma fitness after Congress Shama Mohammad controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.