Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचा फॉर्म हा गगनचुंबी झेप घेतोय.... २०२२ या कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त सर्वाधिक ११६४ धावा त्याने केल्या. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला दुसरा फलंदाज ठरला आहे. आयसीसीने आज जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत मधळ्या फळीतील फलंदाज सूर्याचे वर्चस्व पाहायला मिळतेय.. सूर्याने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखताना कारकीर्दितील सर्वाधिक रेटींग पॉईंड्सची नोंद केली. भारतीय संघात सध्या खेळत असलेल्या फलंदाजांमध्ये विराट कोहलीचा आता त्याच्या पुढे आहे.
सूर्यकुमार यादव परवडणारा नाही, त्याच्यासाठी संघातील सर्वांना...! असं का म्हणतोय ग्लेन मॅक्सवेल?
भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सूर्याला खूप संघर्ष करावा लागला. २०२१मध्ये पदार्णाची संधी मिळाली आणि त्याने त्यानंतर मागे वळूनच पाहिले नाही. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ७ मॅन ऑफ दी मॅच पटकावण्याच्या झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा याच्या विक्रमाशी सूर्यकुमारने बरोबरी केली. विराट कोहलीने २०१६ मध्ये सहा मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकले होते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २३९ धावा करणाऱ्या सूर्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही दम दाखवला. त्याने १२४ धावांसह मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला. किवींविरुद्ध ३२ वर्षी सूर्याने दुसऱ्या सामन्यात १११ धावांची खेळी केली. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त २ शतक झळकावणारा सूर्या चौथा फलंदाज ठरला आहे. कॉलिन मुन्रो ( न्यूझीलंड, २०१७), रोहित शर्मा ( भारत, २०१८) व रिली रोसोवू ( दक्षिण आफ्रिका, २०२२) यांनी हा पराक्रम केला आहे.
भारतीय संघात सर्वाधिक रेटिंग पॉईंट्स ८९७ हे विराटच्या खात्यात आहेत, त्यानंतर सूर्यकुमार ( ८९५) व लोकेश राहुल ( ८५४) यांचा क्रमांक येतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"