कर्णधार झाल्यावर बिघडली सूर्यकुमार यादवची कामगिरी! पाहा आधीची आणि नंतरची आकडेवारी

Suryakumar Yadav, Team India Captain, Ind vs Eng 3rd T20 : टी२० कर्णधारपद मिळाल्यापासून सूर्याची कामगिरी खूपच खराब झाली आहे. त्यानिमित्ताने पाहूया महत्त्वाची आकडेवारी.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 12:22 IST2025-01-29T12:17:25+5:302025-01-29T12:22:24+5:30

whatsapp join usJoin us
Suryakumar Yadav performance deteriorated after becoming team India captain see before and after statistics Ind vs Eng 3rd t20 | कर्णधार झाल्यावर बिघडली सूर्यकुमार यादवची कामगिरी! पाहा आधीची आणि नंतरची आकडेवारी

कर्णधार झाल्यावर बिघडली सूर्यकुमार यादवची कामगिरी! पाहा आधीची आणि नंतरची आकडेवारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Suryakumar Yadav, Team India Captain, Ind vs Eng 3rd T20 : इंग्लंड विरूद्धच्या टी२० मालिकेत पहिल्या दोन सामन्यात विजय मिळाल्यानंतर भारताला तिसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने बेन डकेटच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात १७१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून हार्दिक पांड्याने ४० धावा केल्या. पण भारताला २० षटकात १४५ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने दोन सामने जिंकले आणि एक सामना हरला. या तीनही सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी चिंतेची बाब म्हणजे सूर्यकुमार यादवचा फॉर्म. टी२० कर्णधारपद मिळाल्यापासून सूर्याची कामगिरी खूपच खराब झाली आहे. त्यानिमित्ताने पाहूया महत्त्वाची आकडेवारी.

कॅप्टन झाल्यावर खालावली सूर्यकुमारची कामगिरी

सूर्यकुमार यादवने एक खेळाडू म्हणून टीम इंडियासाठी ५८ टी२० सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ४३ च्या सरासरीने आणि १६८ च्या स्ट्राइक रेटने २,०४० धावा केल्या. या काळात त्याने ३ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली. कर्णधार झाल्यावर मात्र सूर्यकुमारची कामगिरी ढासळली. त्यने आतापर्यंत २० टी२० सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत खेळलेल्या १९ डावांमध्ये त्याने १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ३१ च्या सरासरीने आणि १६७ च्या स्ट्राईक रेटने केवळ ५५६ धावा केल्या आहेत. त्यातही भारताचे T20 कर्णधारपद पूर्णपणे स्वीकारल्यापासून, सूर्यकुमार यादवने ९ डावात केवळ एका अर्धशतकासह केवळ १६४ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी आणि स्ट्राइक रेटमध्ये मोठी घट झाली आहे. या कालावधीत, सूर्याची फलंदाजी सरासरी २०च्या खाली म्हणजेच १८ पर्यंत घसरली आहे. तर स्ट्राइक रेट देखील १५५ पर्यंत घसरला आहे.

इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत सूर्याची कामगिरी

दरम्यान, भारताने या मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यातील पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंजावे लागले. तर तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या तीनही सामन्यात सूर्यकुमार यादव फ्लॉप ठरला. पहिल्या सामन्यात तो दुसऱ्या चेंडूवर भोपळाही न फोडता माघारी परतला. दुसऱ्या सामन्यात त्याने ३ चौकारांसह १२ धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात त्याने १ चौकार आणि १ षटकार लगावत १४ धावा केल्या.

Web Title: Suryakumar Yadav performance deteriorated after becoming team India captain see before and after statistics Ind vs Eng 3rd t20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.