Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यकुमार यादव 'आऊट'; WTC फायनलसाठी टीम इंडियाची अशी असेल प्लेईंग इलेव्हन?

राहुल द्रविड आणि रोहित शर्मा टीम इंडियात कोणाला स्थान देतात हे पाहावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 15:10 IST

Open in App

आयपीएलनंतर आता क्रिकेट चाहत्यांना वेड लागलं आहे ते WTC स्पर्धेचं. त्यासाठी, टप्प्याटप्प्याने टीम इंडियातील शिलेदार आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना होत होते. आयपीएल 'चॅम्पियन' संघाचे खेळाडू अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा हे देखील लंडन येथे दाखल झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाचे प्लेईंग इलेव्हन खेळाडू निश्चित झाले असून सुर्यकुमार यादवला या संघात स्थान मिळाले नाही. 

राहुल द्रविड आणि रोहित शर्मा टीम इंडियात कोणाला स्थान देतात हे पाहावे लागणार आहे. या WTC सामन्यासाठी भारताचे १८ खेळाडू ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत. १५ खेळाडूंसह ३ राखीव खेळाडूंनाही नेण्यात आलं आहे, जे तीन खेळाडू प्लेईंग ११ चा भाग असणार नाहीत. या राखीव खेळाडूंमध्ये गोलंदाज मुकेशकुमार, यशस्वी जैसवाल आणि सूर्यकुमार यादव हे तीनजण आहेत. त्यामुळे, टीम इडिंयाच्या प्लेईंग ११ मध्ये सूर्यकुमार यादव नसणार हे आता निश्चित झाले आहे. 

ओपनिंगमध्ये रोहित शर्मासह शुभमन गिल मैदानात उतरणार असल्याचे निश्चित आहे. तर, तिसऱ्या नंबर चेतेश्वर पुजारा खेळण्यात येईल. माजी कर्णधार विराट कोहली ४ थ्या नंबरवर उतरेल. त्यानंतर, ५ व्या स्थानावर अजिंक्य रहाणे मैदानात उतरणार असल्याचे समजते. सहाव्या क्रमांकावर ईशान किशनऐवजी विकेटकीपर केएस भरत येण्याची शक्यता आहे. स्पीनरला संधी दिल्यास सध्या रविंद्र जडेजाचं पारडं जड आहे. तर, शार्दुल ठाकूरला अश्विनच्या जागी स्थान मिळू शकते. त्यासोबतच, या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा तीन जलद गती गोलंदाजांना स्थान देऊ शकते. त्यामध्ये, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांचा समावेश होऊ शकतो. 

दरम्यान,  त्यानुसार WTC अंतिम सामन्यासाठी ही संभाव्य टीम असेल - रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव

टॅग्स :रोहित शर्माराहुल द्रविडभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ
Open in App