Join us

IPL 2024: आपला दादूस आला रे...! मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर; 'सूर्या'ची अखेर एन्ट्री

Suryakumar Yadav IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 16:38 IST

Open in App

Suryakumar Yadav News: मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आपल्या सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या पलटनची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यात संघाचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादवची अनुपस्थिती आणखीच घातक ठरली. पण, आता बहुचर्चित अशा 'सूर्या'ची अखेर एन्ट्री झाली असून तो मुंबईच्या ताफ्यात सामीला झाला आहे. फ्रँचायझीने सूर्याच्या रॉयल एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईचा पुढचा सामना आपल्या घरच्या मैदानावर (वानखेडे स्टेडियम) दिल्ली कॅपिटल्सशी (MI vs DC) होणार आहे. त्यामुळे या सामन्यात सूर्या दिसेल यात शंका नाही. (IPL 2024 News) 

खरं तर दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-२० मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि सुरुवातीला तो सात आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला होता. त्यानंतर आणखी एक दुखापत झाली आणि त्याला हर्नियाचे ऑपरेशन करावे लागले, ज्यामुळे त्याचा पुनरागमनाचा काळ लांबला. ICC रँकिंगमधील ट्वेंटी-२० त नंबर १ फलंदाज 'सूर्या'ची उपलब्धता मुंबई इंडियन्ससाठी मोठी गोष्ट आहे. त्यांना आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला. बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीने ( NCA)  बुधवारी तीन महिन्यांहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर असलेल्या मधल्या फळीतील फलंदाजाला तंदुरुस्त म्हणून घोषित केले. 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ तीन सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याचे दिसले. जसप्रीत बुमराहला पहिले षटक का दिले जात नाही असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात यजमान हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा करून इतिहास रचला. 

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवमुंबई इंडियन्सआयपीएल २०२४