IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघाचा पहिला सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. त्या सामन्यासाठी पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने कसून तयारी केली आहे. पण, या सामन्यात मुंबई इंडियन्सला प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्याशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमारला दुखापत झाली होती आणि तो NCA त दाखल झाला होता. दरम्यान, मुंबई इंडियन्सने शनिवारी चाहत्यांना मोठं सप्राईज दिलं.
मुंबई इंडियन्सने ताफ्यात रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी सूर्यकुमार यादव हा एक आहे. त्यामुळे तो मुंबईसाठी खूप महत्त्वाचा फलंदाज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत दुखापत झाली होती आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली होती. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याला सलामीचा सामना खेळून दुखापतीबाबत उगाच धोका पत्करू नकोस, असा सल्ला दिला होता. त्यामुळे पूर्णपणे बरा झाल्यानंतरच तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार होता. तो दिवस अखेरच उजाडला आहे. आज सूर्यकुमार यादव MI च्या ताफ्यात दाखल होणार आहे आणि इशान किशनने एक व्हिडीओ पोस्ट करून हे संकेत दिले आहेत,
२७ मार्चनंतर मुंबई इंडियन्स दुसरा सामना २ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. सूर्यकुमारला अंगठ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी अतिरिक्त पाच दिवस मिळत आहेत. त्यामुळे तो दुसरा सामना नक्की खेळेल, असा विश्वास बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला होता. आयपीएलमध्ये त्याने ११५ सामन्यांत २३४१ धावा केल्या आहेत आणि त्यात १३ अर्धशतकांचा समावेश आहे.
Mumbai Indians IPL 2022 Time Table
२७ मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
२ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
६ एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
९ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१३ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१६ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स , ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
२१ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
२४ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
३० एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
६ मे - गुजरात टायट्सन विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
९ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१२ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
१७ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
२१ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून