भारतीय संघाने नेदरलँड्स विरुद्धचा सामना जिंकत साखळी फेरीत खणखणीत 'चौकार' मारत सुपर ८ च्या लढतींसाठी शड्डू ठोकला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. सामन्यानंतर संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक करताना पहिल्या तीन सामन्यात फ्लॉप ठरलेल्या सलामीवीर अभिषेक शर्मासंदर्भात मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
फिनिशरच्या रुपात रिंकू-पांड्यासह या खेळाडूंवर भरवसा
भारतीय संघाच्या कर्णधाराने दव पडल्यावर गोलंदाजी करणं कठीण होईल, हे माहित असताना पहिल्यांदा फलंदाजी केली. यासंदर्भात तो म्हणाला की, "हो, नक्कीच आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती. १९० धावांपर्यंत पोहचल्यावर गोलंदाजी करण्यासाठी आल्यावर मैदानात दव होते. गोलंदाजांसाठी ही आव्हानात्मक परिस्थितीत होती. सरशेवटी आम्ही जिंकलो. ही गोष्ट समाधानकारक वाटते. पुढच्या सामन्यात अशीच परिस्थिती असू शकते. फलंदाजीत फिनिशरच्या रुपात हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर आणि वॉशिंग्टन सारखे पर्याय आहेत, त्यामुळे फलंदाजी अधिक मजबूत वाटते, असा उल्लेख त्याने यावेळी केला.
IND vs NED : सिराजची जर्सी घालूनही दिसलं नाही अभिषेकच्या बॅटमधील 'मॅजिक', पुन्हा पदरी पडला 'भोपळा'
फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या अभिषेक सर्वोत्तम पर्यायी गोलंदाज, नेमकं काय म्हणाला सूर्या?
स्वत:सह संघाच्या फलंदाजीसंदर्भात सूर्या म्हणाला की, प्रत्येक फलंदाज आपले योगदान देत आहे. हेच मला हवे होते. छोट्या छोट्या भागादीरीसह डाव सावरणं महत्त्वाचे आहे. चुरशीच्या सामन्यात सर्व फलंदाजांकडून योगदान गरजेचे आहे. यावेळी त्याने धावांसाठी संघर्ष करत असलेला अभिषेक शर्मा हा गोलंदाजीतही एक पर्याय असल्याचे सांगितले. मधल्या षटकात गोलंदाजीसाठी माझ्याकडे खूप पर्याय आहेत. कधी कधी हा आनंददायी डोकेदुखीचा विषय ठरतो. या यादीत त्याने अभिषेक शर्माचे पहिले नाव घेतले. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि दुबेचाही उल्लेख केला. खेळपट्टीनुसार हे गोलंदाज माझ्यासाठी मधल्या षटकात उपयुक्त ठरू शकतात, असे सांगत सूर्यानं वेळप्रसंगी अभिषेक शर्मा गोलंदाजीत उपयुक्त ठरू शकतो, असे स्पष्ट करत तो पुढच्या सामन्यातही गेम प्लॅनचा भाग असेल याची हिंटच दिली आहे.
हे काय बोलून गेला सूर्या?
नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात एक षटक टाकताना अभिषेक शर्मानं १० धावा खर्च केल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत ३ सामन्यात त्याने ९ चेंडू खेळताना एकही धाव काढलेली नाही. अभिषेक शर्मा फलंदाजीत संघर्ष करत असताना मध्यफळीत तो गोलंदाजीचा पर्याय असल्याचे सांगत सूर्यानं त्याची पाठराखण केली आहे. पण संघात त्याच्यापेक्षा उत्तम गोलंदाज असताना तो खरंच सर्वोत्तम पर्या आहे का? एक प्रश्नच आहे. त्यामुळे सूर्या हे काय बोलून गेला? असा प्रश्न काही क्रिकेट जाणकारांना नक्कीच पडू शकतो.