Join us

'अतिशहाणे' पाकिस्तान क्रिकेट बोर्ड! रिझवानच्या विकेटचा वाद ICCच्या पुढ्यात मांडणार!

ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत पाकिस्तानची काय अवस्था केली, हे कोणापासूनही लपलेले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 15:18 IST

Open in App

Mohammad Rizwan PAK vs AUS 2nd Test: पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तिथे त्यांची पहिल्या दोन कसोटीत काय अवस्था काय झाली हे कोणापासून लपलेले नाही. पण, याशिवाय आणखी गोष्टही दिसली. पाकिस्तानला आपला पराभव सहजासहजी पचनी पडत नाही असं दिसतंय. मेलबर्न मधील दुसरी कसोटी गमावल्यानंतर मालिका जिंकण्याच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्याच आहेत. त्यानंतर आता मोहम्मद रिझवानच्या विकेटबद्दलचा मुद्दा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ICC समोर मांडणार असल्याचे समजत आहे.

मोहम्मद रिझवानबाबत काय वाद झाला?

कसोटीच्या दुसऱ्या डावात ३५ धावा करून मोहम्मद रिझवान बाद झाला. त्याची विकेट पॅट कमिन्सने घेतली. पण त्याच्या विकेटवर बरेच वाद झाले. ६१ व्या षटकात कमिन्सकडून आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी रिझवान खाली बसला पण चेंडू त्याच्या ग्लोव्हजच्या पट्ट्याला लागला आणि यष्टिरक्षक अलेक्स कॅरीने त्याचा झेल घेतला. ऑनफिल्ड अंपायरने रिझवानला नाबाद ठरवले.

ऑस्ट्रेलियन खेळाडू अंपायरच्या निर्णयावर नाखूश दिसले आणि त्यांनी रिव्ह्यू घेतला. यावेळी रिजवान त्याच्या हाताला स्पर्श करत होता, जणू काही तो म्हणत होता की चेंडू त्याच्या बॅट किंवा ग्लोव्हजच्या कोणत्याही भागाला स्पर्श करून गेलेला नाही. मात्र तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिल्यानंतर खरी गोष्ट समोर आला. चेंडू रिझवानच्या ग्लोव्हजच्या पट्ट्याला लागला होता आणि त्यामुळे तिसऱ्या अंपायरने त्याला बाद दिले. रिप्लेमध्ये बाद असल्याचे स्पष्टपणे दिसत असूनही, पाकिस्तानी चाहते तो निर्णय चुकीचा असल्याचे म्हणताना दिसले. थर्ड अंपायरच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट करण्यात आल्या.

टॅग्स :पाकिस्तानआॅस्ट्रेलियाआयसीसी