Join us  

India vs England : जबरा फॅन...!; टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'तो' चक्क टेकडीवर जाऊन बसला अन्...

India vs England, 1st ODI : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात सुरू असलेल्या भारत-इंग्लंड वन डे मालिकेत स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 5:27 PM

Open in App

India vs England, 1st ODI : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात सुरू असलेल्या भारत-इंग्लंड वन डे मालिकेत स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे रिकाम्या स्टेडियमवर खेळाडूंना खेळावं लागत आहे. अशातही भारतीय क्रिकेट संघाचे चाहते स्टेडियमबाहेर उभे राहून किंवा स्टेडियमशेजारील इमारतीच्या टेरेसवर जाऊन चिअर करताना दिसत आहेत. पण, टीम इंडियाचा जबरा फॅन सुधीर कुमार चौधरी ( Sudhir Kumar Chaudhary) हा विराट कोहली ( Virat Kohli) अँड कंपनीला चिअर करण्यासाठी टेकडीवर जाऊन बसला.  टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्या वन डेत दुखापतग्रस्त झालेल्या फलंदाजाची मालिकेतून माघार, IPL 2021लाही मुकणार?

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत-इंग्लंड यांच्यातल्या वन डे मालिकेचे सामने सुरू आहेत. तिथून जवळपास अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या वाघजाई मंदिराच्या टेकडीवर सुधीर कुमार चौधरी जाऊन बसला आणि तिथून तो टीम इंडियाला चिअर करत होता. मुळचा बिहारचा असलेला सुधीर हा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा जबरदस्त फॅन आहे. टीम इंडियाला चिअर करण्यासाठी तो शरीरावर तिरंग्याचा रंग लावतो आणि तेंडुलकर असे लिहून हातात तिरंगा व शंख घेऊन मैदानावर उपस्थित असतो.  

Team India Won the 1st ODI match against England. With out Audience

Posted by Sudhir Kumar Chaudhary on Tuesday, March 23, 2021
पदार्पणवीरांना गाजवला सामनाटीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी इंग्लंडविरुद्धचा पहिला वन डे सामना गाजवला. टीम इंडियाच्या ५ बाद ३१७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी १३५ धावांची सलामी दिली. पण, त्यानंतर त्यांचा डाव गडगडला. सर्वप्रथम फलंदाजीत कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) फटकेबाजी ( ३१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा) करत इंग्लंडच्या गोलंदाजांच्या डोळ्यांत अश्रू आणले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना फ्रंटसीटवर बसलेल्या पाहुण्यांना पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) यानं बॅकफूटवर टाकले. वडिलांची हॅट, शूज अन् कपडे घेऊन हार्दिक-कृणाल पांड्या टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले, Photo Viral

शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यानं ट्वेंटी-20 मालिकेपाठोपाठ वन डेतही आपली धमक दाखवली आणि इंग्लंडची पळता भूई करून सोडली. इंग्लंडचा डाव २५१ धावांवर गुंडाळून भारतानं हा सामना ६६ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.  टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर ९८ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आाला.  प्रसिद्ध कृष्णानं ५४ धावांत ४ विकेट्स घेतल्या, शार्दूलनं तीन, तर भुवीनं दोन विकेट्स घेतल्या.  मोठी बातमी : टीम इंडियाचा स्टार खेळाडू २ महिने राहू शकतो क्रिकेटपासून दूर; रोहित शर्मा व श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे अपडेट्स

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडपुणे