मोठी बातमी : टीम इंडियाचा स्टार खेळाडू २ महिने राहू शकतो क्रिकेटपासून दूर; रोहित शर्मा व श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे अपडेट्स

IND vs ENG : या सामन्यात भारताचे दोन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यापैकी एक खेळाडू आगामी आयपीएल ( IPL 2021) खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:46 PM2021-03-24T12:46:30+5:302021-03-24T12:46:55+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG : Shreyas Iyer dislocates his shoulder, doubtful for IPL 2021, Mumbai Indians worried about Rohit Sharma | मोठी बातमी : टीम इंडियाचा स्टार खेळाडू २ महिने राहू शकतो क्रिकेटपासून दूर; रोहित शर्मा व श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे अपडेट्स

मोठी बातमी : टीम इंडियाचा स्टार खेळाडू २ महिने राहू शकतो क्रिकेटपासून दूर; रोहित शर्मा व श्रेयस अय्यरच्या दुखापतीचे अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England : भारतीय संघानं पुण्यात झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात दमदार पुनरागमन करताना ६६ धावांनी विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी करताना भारताला सडेतोड उत्तर दिले होते. पण, पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णानं ( Prasidh Krishna) चार विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. शार्दूल ठाकूरनंही ( Shardul Thakur) तीन विकेट्स घेत इंग्लंडला धक्के दिले. ५ बाद ३१७ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा डाव २५१ धावांवर गडगडला. भारताच्या या विजयी आनंदात एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. या सामन्यात भारताचे दोन प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यापैकी एक खेळाडू आगामी आयपीएल ( IPL 2021) खेळेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. World Test Championship : न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियानं आखली खास रणनीती; आता किवींचं काही खरं नाही

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma won't take the field ) याला फलंदाजी करताना उजव्या हाताच्या कोपऱ्याला चेंडू लागला. तरीही त्यानं फलंदाजीत २८ धावांचं योगदान दिलं. पण, त्याला दुखापतीमुळे मैदानावर क्षेत्ररक्षणाला येता आलं नाही. इंग्लंडच्या डावाच्या ८व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. (  Shreyas Iyer subluxated his left shoulder in the 8th over while fielding) त्यानंतर त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तो या सामन्यात मैदानावर उतरू शकणार नसल्याचे BCCIनं स्पष्ट केलं. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे स्कॅनचा रिपोर्ट आल्यावर समजेल.  विराट कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग; संघ निवडताना भेदभाव होत असल्याचा गंभीर आरोप

श्रेयसची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे वृत्त समोर येत आहे आणि तो आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( Bad news for Delhi Capitals, Shreyas Iyer dislocates his shoulder, doubtful for IPL 2021) त्याला जवळपास दोन महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.  


बीसीसीआयनं सांगितले की,''श्रेयस अय्यरच्या खांद्याचं हाड सरकलं आहे. त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.''  

दिल्ली कॅपिटल्सची चिंता वाढली
श्रेयस अय्यर आयपीएलच्या मागील ३ पर्वात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. २०१९मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघानं प्ले ऑफमध्ये मजल मारली आणि मागच्या वर्षी संघ प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करू शकला. तज्ज्ञांच्या मते खांद्याचं हाड सरकलं असेल, तर ते ठिक होण्यासाठी सहा आठवडे लागू शकतात आणि शस्त्रक्रिया झाली तर हा कालावधी अजून वाढू शकतो. अशात ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलला तो मुकण्याची शक्यता आहे.  


रोहितची दुखापत गंभीर नाही  
रोहित शर्माची दुखापत गंभीर नाही. सामन्यात तो क्षेत्ररक्षणाला उतरला नव्हता, परंतु सामन्यानंतर तो खेळाडूंसोबत दिसला. त्यानं हाताच्या कोपऱ्यावर पट्टी लावली होती. 

Web Title: IND vs ENG : Shreyas Iyer dislocates his shoulder, doubtful for IPL 2021, Mumbai Indians worried about Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.