हार्दिक पांड्या-रोहित शर्माबाबत रंगल्या अजब चर्चा, अखेर Mumbai Indiansला द्यावं लागलं उत्तर

Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians IPL 2026: यंदाचा हंगाम २८ मार्चपासून सुरु होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:48 IST2026-03-14T15:47:12+5:302026-03-14T15:48:04+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Strange discussions took place regarding Hardik Pandya Rohit Sharma finally Mumbai Indians had to give an answer IPL 2026 | हार्दिक पांड्या-रोहित शर्माबाबत रंगल्या अजब चर्चा, अखेर Mumbai Indiansला द्यावं लागलं उत्तर

हार्दिक पांड्या-रोहित शर्माबाबत रंगल्या अजब चर्चा, अखेर Mumbai Indiansला द्यावं लागलं उत्तर

Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians: IPL 2026 साठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. लीगचा १९ वा हंगाम २८ मार्च रोजी सुरू होणार आहे. या हंगामासाठी सर्व संघांनी आपली तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयने सुरुवातीच्या सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. यादरम्यान, पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधून समोर आलेल्या चर्चांमुळे साऱ्यांनाच धक्का बसला. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने हंगाम सुरू होण्यापूर्वी माजी कर्णधार रोहित शर्माला इशारा दिला होता. या चर्चा इतक्या वाढल्या की, मुंबई इंडियन्सला यावर उत्तर द्यावे लागले.

रोहित-हार्दिकबद्दल अजब चर्चा

आयपीएल २०२६ च्या आधी, मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये एक मोठी अफवा पसरली. असा दावा केला गेला की कर्णधार हार्दिक पांड्याने माजी कर्णधार रोहित शर्माला इशारा दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की हार्दिकने संघ व्यवस्थापनाला कळवले आहे की रोहित शर्माला यावेळी धावा करण्यात अपयश आले तर सहन केले जाणार नाही. दाव्यानुसार, गेल्या १०-१२ वर्षांनंतर गेल्या वर्षीच्या रोहितच्या कामगिरीवर व्यवस्थापन नाराज आहे, कारण तो प्रति हंगाम फक्त २००-३०० धावा करू शकला आहे, तरीही तो संघाच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.

मुंबई इंडियन्सचे मजेशीर उत्तर

ही बातमी सोशल मीडियावर झपाट्याने पसरली आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली. गेल्या काही काळापासून IPL मधील रोहित शर्माचा फलंदाजीचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. २०१३ पासून त्याने कोणत्याही आयपीएल हंगामात ५०० धावा केलेल्या नाहीत. गेल्या हंगामात त्याने १५ सामन्यांमध्ये ४१८ धावा केल्या. तथापि, मुंबई इंडियन्सने ही अफवा स्पष्टपणे फेटाळून लावली. संघाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सनी फक्त दोन शब्दांत प्रतिसाद दिला: "कुछ भी..." सोबतच त्यांनी हार्दिक पांड्याचा एक मजेदार GIF देखील पोस्ट केला, ज्यामुळे हा दावा पूर्णपणे निराधार आणि खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी एकत्रित अनेक सामने खेळले आहेत. गेल्या दोन हंगामात हार्दिक कर्णधार झाल्यापासून रोहितला संघात कमी महत्त्व मिळते असा आरोप चाहत्यांकडून केला जातो. पण संघ व्यवस्थापनाने मात्र हा आरोप सातत्याने फेटाळला आहे.

Web Title : मुंबई इंडियंस ने हार्दिक पांड्या और रोहित शर्मा के बीच दरार की अफवाहों का खंडन किया

Web Summary : हार्दिक पांड्या द्वारा रोहित शर्मा को प्रदर्शन के बारे में चेतावनी देने की अफवाहें फैलीं। मुंबई इंडियंस ने तुरंत इन दावों का खंडन किया और उन्हें हास्यपूर्ण प्रतिक्रिया के साथ निराधार बताया।

Web Title : Mumbai Indians Denies Rift Rumors Between Hardik Pandya and Rohit Sharma

Web Summary : Rumors spread about Hardik Pandya warning Rohit Sharma regarding performance. Mumbai Indians swiftly refuted these claims, dismissing them as baseless with a humorous response.