Join us

Ouchh! कॅच घेण्याच्या प्रयत्नात डेव्हिड वॉर्नरची झाली वाईट अवस्था, वेदनेने कळवळला; पण नेमकं काय झालं? Video

Sri Lanka vs Australia Galle Test: ऑस्ट्रेलियाने तीन दिवसांच्या आत श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 18:09 IST

Open in App

Sri Lanka vs Australia Galle Test: ऑस्ट्रेलियाने तीन दिवसांच्या आत श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स राखून सामना जिंकताना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC) अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे.  श्रीलंकेच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा ऑसी गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेचा दुसरा डाव ११३ धावांवर गुंडाळला गेला. ट्रॅव्हीस हेडने ३ षटकांत ४ विकेट्स घेतल्या, तर नॅथन लियॉन यानेही चार विकेट्स घेतल्या. या सामन्यात लियॉनने एकूण ९ विकेट्स घेतल्या.  

ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व असलेल्या या सामन्यात एक गमतीदार प्रसंग घडला. श्रीलंकेचा फलंदाज जेफ्री व्हॅडेर्साय स्ट्राईकवर होता आणि हेडच्या अविश्वसनीय चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. चेंडू यष्टींवर आदळला अन् स्लिपला उभ्या असलेल्या डेव्हिड वॉर्नरने तो झेलण्याचा प्रयत्न केला. पण, तितक्याच बेल्स त्याच्या नाजूक जागेवर आदळली अन् तो वेदनेने कळवळला..     श्रीलंकेच्या पहिल्या डावातील २१२ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ३२१ धावा केल्या. उस्मान ख्वाजा ( ७१) व अॅलेक्स केरी ( ७७) यांनी अर्धशतकी खेळी केली. श्रीलंकेचा दुसरा डाव २२.५ षटकांत ११३ धावांवर गडगडला. नॅथन लियॉनने ११-१-३१-४ अशी,  तर ट्रॅव्हिस हेडने २.५-०-१०-४ अशी कामगिरी केली. ४ चेंडूंत ऑस्ट्रेलियाने १० धावांचे लक्ष्य पार केले.  

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलियाश्रीलंका
Open in App