Asia Cup SL vs AFG, Nuwan Thushara Unplayable Delivery To Sediqullah Atal : आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात 'ब' गटातील अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना रंगला आहे. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयालानुवान थुशारा याने पॉवर प्लेमध्येच सुरुंग लावला. 'बेबी मलिंगा' अर्थात लसिथ मलिंगाच्या स्टाईलमध्ये आडवा हात मारुन गोलंदाजी करणाऱ्या पठ्ठ्यानं आघाडीच्या तीन फलंदाजांना स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. यात गुरबाझच्या रुपात पहिली विकेट झेलबादच्या स्वरुपात घेतल्यावर त्याने अफगाणिस्तानच्या दोघांना अप्रतिम चेंडूवर क्लीन बोल्ड केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी एका षटकात दोन विकेट्सचा डाव साधला, मग त्यात पडली एकदम भारी विकेट्सची भर
अफगाणिस्तानच्या डावातील तिसऱ्या षटकात सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाझ याच्या रुपात नुवान थुशारानं आपल्या विकेट्सचं खातं उघडले. त्याची जाघा घेण्यासाठी आलेल्या करिम जन्नतला त्याने अवघ्या एका धावेवर बोल्ड करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर सलामीवीर सेदीकुल्ला अटल याला त्याने अप्रतिम चेंडूवर चकवा दिला. चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर पडला अन् चेंडू कमालीचा स्विंग होऊन ऑफ स्टंपला लागला. हा चेंडू इतका भारी होता की, आशिया कप स्पर्धेतील सर्वोत्तम विकेट्स कोणत्या गोलंदाजाने घेतली याची यादी काढताना नुवान थुशारा नंबर वन ठरेल.
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
टॉस जिंकला, पण नुवान थुशारामुळ् प्लॅन फसला
नुवान थुशारा याने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये ३ षटके गोलंदाजी करताना अवघ्या १२ धावा खर्च करताना ३ विकेट्स घेत अफगाणिस्तानच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. अटलच्या रुपात अफगाणिस्तानच्या संघाने पॉवर प्लेमध्ये ४० धावांवर आपली तिसरी विकेट गमावली. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी अफगाणिस्तानसाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. धावांचा पाठलाग करताना दबावात गणित बिघडू नये, यासाठी टॉस जिंकल्यावर राशिद खानने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण नुवान थुशारामुळे अफगाणिस्तानचा डाव फसल्याचे दिसून आले.