Sri Lanka U19 vs India U19, 2nd Semi Final : युएईत सुरु असलेल्या १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील सेमी फायनलच्या लढती वेगवेगळ्या मैदानात सुरु आहेत. पहिल्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन संघ मैदानात उतरले आहेत. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात लढत रंगली आहे.
टीम इंडियाची दमदार सुरुवात
भारत आणि श्रीलंका यांच्यातील शारजाहच्या मैदानात सुरु असलेल्या सामन्यात श्रीलंकन कॅप्टननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा गोलंदाजी करताना भारतीय संघाने जबरदस्त सुरुवात करत मॅचवर सुरुवातीलाच मजबूत पकड मिळवल्याचे पाहायला मिळाले.
८ धावांवर श्रीलंका संघाने एकापाठोपाठ गमावल्या ३ विकेट्स
युवा टीम इंडियाच्या ताफ्यातील चेतन शर्मानं श्रीलंकेच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. धावफलकावर अवघ्या ८ धावा असताना श्रीलंकेच्या संघाने आपल्या ३ विकेट्स गमावल्या. दुलनिथ सिगेरा आणि पुलिंदू परेरा या जोडीनं श्रीलंकेच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर ८ धावा लागल्या असताना तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूव सलामीवीर परेराच्या रुपात लंकेच्या संघानं रन आउटच्या रुपात पहिली विकेट गमावली. चौथ्या षटकातील तिसऱ्या चंडूवर चेतन शर्मानं दुनिथ सिगेराला तंबूचा रस्ता दाखवला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या विमथ दिनसराला चेतन शर्मानं आल्या पावली माघारी धाडले. परिणामी ८ या धावेवरच श्रीलंकेच्या संघाने ३ विकेट्स गमावल्या.
भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल?
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला सेमी फायनल सामना सुरु आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सेमीफायनलमधील विजेते ८ डिसेंबरला दुबईच्या मैदानात फायनल सामना खेळताना दिसतील. भारतीय संघानं 'अ' गटात दुसऱ्या क्रमांकावर राहून सेमीफायनल गाठली आहे. दुसरीकडे पाकिस्तान या गटात अव्वलस्थानावर राहिला होता. जर भारतीय संघाने श्रीलंकेला आणि पाकिस्तानच्या संघानं बांगलादेशला पराभूत केले तर क्रिकेट चाहत्यांसाठी या स्पर्धेची सांगता ही सुपर संडेची अनुभूती देणारी ठरेल. कारण फायनलमध्ये भारत पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना पाहायला मिळेल.
Web Title: Sri Lanka U19 vs India U19, 2nd Semi Final India Rattle Sri Lanka's Top-Order
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.