स्पेन क्रिकेट संघाचा विश्वविक्रम! केला टीम इंडिया, ऑस्ट्रेलियालाही न जमलेला पराक्रम

Spain Cricket Team World Record: स्पेनने जो भीमपराक्रम केला तो इतर कुठल्याही बलाढ्य संघाला अद्याप जमलेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 09:29 IST2024-08-27T09:26:30+5:302024-08-27T09:29:17+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Spain Cricket Team Surpass team India Afghanistan as most consecutive wins World Record In T20I Cricket | स्पेन क्रिकेट संघाचा विश्वविक्रम! केला टीम इंडिया, ऑस्ट्रेलियालाही न जमलेला पराक्रम

स्पेन क्रिकेट संघाचा विश्वविक्रम! केला टीम इंडिया, ऑस्ट्रेलियालाही न जमलेला पराक्रम

Spain Cricket Team World Record: क्रिकेट जगतातील विक्रम म्हटलं की कुणालाही आठवतात ते टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड यांसारखे तगडे संघ. पण स्पेनच्या क्रिकेट संघाने क्रिकेटमध्येही एक मोठा इतिहास रचला आहे. या संघाने टी२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आजपर्यंत इतर कोणताही संघ हा पराक्रम करू शकलेला नाही. पुरुषांच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग १४ सामने जिंकणारा स्पेन हा पहिला संघ ठरला आहे. याआधी मलेशियाचा संघ सलग १३ सामने जिंकून अव्वलस्थानी होता. मलेशियाने टीम इंडियाचा विक्रम मोडीत काढला होता. पण आता स्पेनने मलेशियाला मात देत इतिहास रचला.

स्पेनने या संघांना सलग १४ सामन्यात केलं पराभूत

स्पेनच्या क्रिकेट संघाने २५ फेब्रुवारी २०२३ पासून सलग १४ टी२० सामने जिंकले. हा संघ शेवटचा इटलीकडून पराभूत झाला होता. यानंतर स्पेनने एकही सामना गमावला नाही. या काळात त्याने आयल ऑफ मॅन, जर्सी, क्रोएशिया, सायप्रस, झेक प्रजासत्ताक आणि ग्रीस या संघांचा पराभव केला. स्पेनने आपल्या १४व्या सामन्यात ग्रीसचा दणदणीत पराभव केला. हा सामना युरोप टी२० विश्वचषक उप-प्रादेशिक पात्रता C अंतर्गत खेळला गेला. या सामन्यात स्पेनने ग्रीसचा ७ विकेट्सने पराभव करत हा विक्रम आपल्या नावावर केला.

टीम इंडिया यादीत कितवा?

भारतीय संघाच्या नावे सलग १२ टी२० सामने जिंकण्याचा विक्रम आहे. सर्वाधिक सलग टी२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. भारतापेक्षा स्पेन (१४), मलेशिया (१३), बर्म्युडा (१३), अफगाणिस्तान (१२) आणि रोमानिया (१२) हे संघ पुढे आहेत. भारतीय संघाने नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हे १२ सामने जिंकले होते. ICC टी२० क्रमवारीत अव्वल-१० मध्ये भारत आणि अफगाणिस्तान हे दोनच संघ आहेत, ज्यांनी सलग १० किंवा अधिक टी२० सामने जिंकले आहेत. पाकिस्तानचा सलग ९ सामन्यांचा विक्रम आहे.

Web Title: Spain Cricket Team Surpass team India Afghanistan as most consecutive wins World Record In T20I Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.