INDW vs SAW Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ भारत दौऱ्यावर येणार असून, इथे ३ वन डे, १ कसोटी आणि ३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिका बंगळुरू आणि चेन्नई या शहरांमध्ये पार पडतील. १३ जून रोजी एक सराव सामना खेळवला जाईल, तर २८ जून ते १ जुलै या कालावधीत ४ दिवसीय कसोटी सामना होईल.
१३ जून ते ९ जुलैपर्यंत थरार
- १३ जून - सराव सामना, SA vs BP XI (बंगळुरू)
 - २८ जून ते १ जुलै - कसोटी सामना (चेन्नई)
 - वन डे मालिका
 
- १६ जून - पहिला सामना
 - १९ जून - दुसरा सामना
 - २३ जून - तिसरा सामना
 
ट्वेंटी-२० मालिका
- ५ जुलै - पहिला सामना
 - ७ जुलै - दुसरा सामना
 - ९ जुलै - तिसरा सामना