ICC T20 World Cup 2026 West Indies vs South Africa, 47th Match : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सुपर ८ फेरीतील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ९ विकेट्स राखून सहज विजय नोंदवला. या सामन्यातील निकालानंतर भारतीय संघाचा सेमीचा मार्ग सोपा झाला आहे. ज्या दक्षिण आफ्रिकेच्या संघामुळे टीम इंडिया 'जर तर'च्या समीकरणात अडकली होती त्याच संघाने भारतासाठी सेमीची लढाई आता स्वबळाची केली आहे. टीम इंडियाला झिम्बाब्वेसह वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकत आता सहज सेमीफायनल गाठता येईल.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
धावांचा पाठलाग करताना मार्करमचं अर्धशतक, क्विंटन डी कॉकसह रायन रिकल्टनचीही तळपली बॅट अन्...
क्विंटन डी कॉक आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचली. क्विंटन डी कॉक २४ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. त्यानंतर मार्करमनं रायन रिकल्टनच्या साथीनं ९ विकेट्स आणि २३ चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. मार्करमनं ४६ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला रायन रिकल्टन याने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ४५ धावा केल्या.
WI vs SA : जेसन होल्डर-रोमारियो शेफर्डचा धडाकेबाज शो! जोडीनं 'या' विश्वविक्रमाला घातली गवसणी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयासह टीम इंडियाचा मार्ग सोपा, पण वेस्ट इंडिजही अजून शर्यतीत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाचा सेमीचा मार्ग सोपा झाला असला तरी टीम इंडियाला उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. वेस्ट इंडिजच्या संघाने सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघाला पराभूत केले होते. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर अजूनही ते सेमीच्या शर्यतीत टिकून आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारताला धक्का देत अजूनही सेमीची दावेदारी ठोकू शकतो. त्यामुळे टीम इंडियासाठी त्यांच्याविरुद्धची लढाईही महत्त्वपूर्णच असेल. त्याआधी टीम इंडियाला झिम्बाब्वेला शह द्यावा लागेल.