South Africa Into Semi Final : भारताचा विजय अन् मदतीला धावलेल्या दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीफायनलचं तिकीट

दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहचणारा दुसरा संघ ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 22:48 IST2026-02-26T22:46:40+5:302026-02-26T22:48:22+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
South Africa Into Semi Final ICC T20 World Cup 2026 After India Beat Zimbabwe | South Africa Into Semi Final : भारताचा विजय अन् मदतीला धावलेल्या दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीफायनलचं तिकीट

South Africa Into Semi Final : भारताचा विजय अन् मदतीला धावलेल्या दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीफायनलचं तिकीट

South Africa Into Semi Final ICC T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील भारत-झिम्बाब्वे यांच्यातील निकालानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सलग दोन विजयासह मिळवलेल्या ४ गुणांसह सेमीफायनलचं तिकीट पक्के केले आहे. गुरुवारी दुपारच्या सत्रात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेस्ट इंडिजला एकहाती पराभूत केले होते. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं मिळवलेला विजय टीम इंडियाला मोठा दिलासा देणारा होता. एका अर्थाने सेमीचा मार्ग मोकळा करण्यासाठी ते भारतीय संघाच्या मदतीलाच धावले. आता भारतीय संघाने झिम्बाब्वेला आउट करताच त्यांचे सेमीच तिकीट पक्के झाले आहे. दुसऱ्या गटातून इंग्लंडच्या संघाने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारल्यावर भारताच्या गटातून दक्षिण आफ्रिका यंदाच्या हंगामात सेमीफायनलच तिकीट मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अन् दक्षिण आफ्रिकेचं  सेमीचं तिकीट झालं पक्के

सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या सामन्यात टीम इंडियाविरुद्ध मोठा विजय नोंदवला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी एकहाती विजय मिळवत आपल्या खात्यात ४ गुण जमा केले होते. भारतीय संघाविरुद्धच्या पराभवासह झिम्बाब्वेचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. एवढेच नाही तर या गटातून सेमीच्या शर्यतीत असलेले भारत-वेस्ट इंडिज दोन्ही पैकी एकच संघ चार गुणापंर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयासह दक्षिण आफ्रिकेचं सेमीच तिकीट पक्के झाले.  दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसरा आणि अखेरचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे.  हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या गटात ६ गुण मिळून टॉपला पोहचू शकतो.

दुसऱ्या सेमीफायलिस्टसाठी भारत-वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार सामना

टी-२०- वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील शेवटचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानातील या सामन्यात या गटातून दुसरा फायनलिस्ट कोण ते पक्के होईल. भारत आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघांनी १-१ विजय मिळवला आहे. जो १ मार्चला मैदान मारेल, तो सेमीफायचं तिकीट पक्के करेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्तम रनरेटसह अव्वलस्थानी विराजमान असल्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा सामना गमावला तरी ते या गटात अव्वल राहतील. त्यामुळे दुसऱ्या  फायनलिस्टला दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागू शककते. 

 

 

 

Web Title : भारत की जीत के बाद दक्षिण अफ्रीका सेमीफाइनल में, मिली मदद!

Web Summary : वेस्ट इंडीज पर दक्षिण अफ्रीका की जीत और उसके बाद भारत की जिम्बाब्वे पर जीत से दक्षिण अफ्रीका ने सेमीफाइनल में जगह बनाई। उनकी जीत से भारत की संभावनाओं को काफी बढ़ावा मिला। इंग्लैंड भी क्वालीफाई कर चुका है; दक्षिण अफ्रीका भारत के समूह से सेमीफाइनल में पहुंचने वाली दूसरी टीम है।

Web Title : South Africa Enters Semi-Finals After India's Win: Aiding Hand!

Web Summary : South Africa secured a semi-final spot after defeating West Indies and India's subsequent victory over Zimbabwe. Their win significantly boosted India's chances. England has also qualified; South Africa is the second team from India's group to reach the semi-finals.