Join us

हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

दुसऱ्यांदा फेकीच्या वादात सापडलाय हा फिरकी गोलंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 11:47 IST

Open in App

South Africa Allrounder Prenelan Subrayen Suspect Bowling Action :  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी-२० मालिकेतील २-१ अशा पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वनडे मालिकेत दमदार सुरुवात केलीये. केर्न्सच्या मैदानातील पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कांगारु संघाविरुद्ध ९८ धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण करणारा ऑल राउंडर  प्रेनेलन सुब्रायन (Prenelan Subrayen) हा गोलंदाजीतील संशायास्पद अ‍ॅक्शनमुळे ICC च्या रडारवर आलाय. त्याला आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून १४ दिवसांची मुदत दिली असून या काळात ऑफ स्पिनर  गोलंदाजाला आपली शैली योग्य आहे हे सिद्ध करावे लागणार आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

प्रेनेलन सुब्रायनला ICC कडून १४ दिवसांचा अल्टिमेटम  

वनडेतील पदार्पणाच्या सामन्यात प्रेनेलन सुब्रायन याने १० षटके गोलंदाजी करताना ४६ धावा खर्च करून एक विकेट घेतली. पण सामन्यानंतर या गोलंदाजाच्या शैलीसंदर्भात आयसीसीकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. सामनाधिकाऱ्यांनी गोलंदाजाच्या अ‍ॅक्शनवर शंका उपस्थितीत केली आहे. त्यामुळे १४ दिवसांत त्याला आयसीसी-अधिकृत बायोमेकॅनिकल लॅबमध्ये चाचणी द्यावी लागणार आहे. या टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन्ही सामन्यात तो गोलंदाजी करू शकतो, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे. 

ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

उर्वरित वनडेत गोलंदाजी करता येणार का?

आयसीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रेनेलन सुब्रायन याच्या गोलंदाजीसंदर्भात १४ दिवसांत अंतिम निर्णय येईपर्यंत त्याच्या गोलंदाजीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात गोलंदाजी  करण्याचा मार्ग खुला असेल. याच वर्षी या गोलंदाजाने झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. तो आतापर्यंत एकमेव कसोटी सामना खेळला आहे.

दुसऱ्यांदा फेकीच्या वादात सापडलाय हा फिरकी गोलंदाज 

प्रेनेलन सुब्रायन फेकी गोलंदाजीमुळे चर्चेत येण्याची तशी ही काही पहिली वेळ नाही. याआधी डिसेंबर २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने दोन स्वतंत्र चाचणीत त्याची गोलंदाजी शैली अयोग्य ठरवत गोलंदाजी शैली सुधारण्याचा  वेळ दिला होता. २०१३ मध्ये गोलंदाजी शैलीत सुधारणा केल्यावर त्याला गोलंदाजीसाठी परवानगी मिळाली होती. आता पुन्हा फेकीच्या वादात अडकला आहे. 

गोलंदाजाला करावा लागणार हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी चाचणीचा सामना फेकी बॉलिंगसाठी आयसीसीकडे एक ठराविक बॉलिंग अ‍ॅक्शन रिव्ह्यू प्रोसिजर आहे. एखाद्या गोलंदाजाची शैलीसंदर्भात संशय निर्माण झाला तर तर थेट बंदीची कारवाई न करता गोलंदाजाची बायोमेकॅनिकल टेस्ट घेतली जाते. आयसीसीच्या अधिकृत सेंटरवर हाय-स्पीड कॅमेरे, सेन्सर आणि 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाते. त्याच्या हाताचा कोन (Elbow Extension Angle) मोजला जातो. जर गोलंदाजी करताना गोलंदाजाच्या हाताचा कोन १५ अंशांपेक्षा जास्त वाकत असेल तर त्याची अ‍ॅक्शन बेकायदेशीर मानली जाते. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाला आता या प्रक्रियेतून जावे लागेल.

टॅग्स :आयसीसीद. आफ्रिकाआॅस्ट्रेलिया