न्यूयाॅर्क : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिच क्लासेन याने नासाउ कौंटी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टी आणि मैदानावर टीका केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) टी-२० क्रिकेटसाठी अमेरिकेत बाजारपेठ शोधत आहे; पण अशा परिस्थितीत अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार करणे कठीण आहे, असे हेनरिच क्लासेनने म्हटले आहे.
विजयानंतर त्याने सांगितले की, जर तुम्हाला जगाला दाखवायचे असेल आणि अमेरिकेत बाजारपेठ हवी असेल, तर अशा परिस्थितीत ते शक्य होणार नाही. ही चुरशीची स्पर्धा आहे. यामुळे अव्वल संघ आणि इतर संघांमधील अंतर कमी झाले आहे.