Smriti Mandhana Record Fastest Hundred By An Indian Batter: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित ५० षटके न खेळता ऑस्ट्रेलियन महिला संघ ४७.५ षटकांतच ऑल आउट झाला. पण बाथ मूनी १३८ (७५), जॉर्जिया ८१ (६८) आणि एलिसा पेरी ६८ (७२) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर कांगारुंच्या संघाने ४१२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधनाने धमाकेदार खेळीचा नजराणा पेश केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी जलद अर्धशतक, मग त्याच तोऱ्यात साजरे केले शतक
४०० पारच्या लढाईत स्मृती मानधना हिने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघाकडून हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. एवढ्यावरच न थांबता तिने ५० चेंडूत शतकाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत तिच्या भात्यातून आलेले हे सलग दुसरे शतक आहे. षटकार मारून तिने भारतीय महिला संघाकडून सर्वात जलद शतक झळाकावले. महिला वनडेत तिच्या भात्यातून आलेले हे दुसरे जलद शतक ठरले.
धावांचा पाठलाग करताना प्रतिका रावलच्या रुपात भारतीय संघाने ३२ धावांवर पहिली विकेट गमावली. तिची जागा घेण्यासाठी आलेल्या हरलीन देओलही ११ धावांची भरघालून तंबूत परतली. पण दुसऱ्या बाजूला स्मृती मानदनाने आपल्या धमाकेदार इनिंग सुरुच ठवली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात स्मृती मानधना हिने अर्धशतक झळकावले होते. धावबाद झाल्यामुळे ती अडखळली. पण त्यानंतर दुसऱ्या आणि आता तिसऱ्या वनडेत तिने शतकी खेळीसह धमाका केलाय.
महिला वनडेत सर्वात जलद शतकांचा विक्रम
४५ चेंडू – मेग लॅनिंग विरुद्ध न्यूझीलंड महिला, नॉर्थ सिडनी ओव्हल, २०१२
५० चेंडू – स्मृती मंधाना विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला, दिल्ली, २०२५
५७ चेंडू – करेन रोल्टन विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला, लिंकन, २०००
५७ चेंडू – बेथ मूनी विरुद्ध भारत महिला, दिल्ली, २०२५
५९ चेंडू – सोफी डिवाईन विरुद्ध आयर्लंड महिला, डब्लिन, २०१८
६० चेंडू – चमारी अटापट्टू विरुद्ध न्यूझीलंड महिला, गॉल, २०२३