Smriti Mandhana Instagram Post: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे २३ नोव्हेंबरला लग्न होणार होते. पण अचानक लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना लग्नाच्या दिवशी अचानक आजारी पडले, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान, सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. काही चॅट्सदेखील व्हायरल झाले, ज्यात पलाश मुच्छलने स्मृती मानधनाची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला. या सर्व दाव्यांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. तशातच आता स्मृतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
स्मृतीचे लग्न लांबणीवर पडले होते त्यानंतर ती फारशी कुठेही दिसली नाही. तिने आपल्या सोशल मीडियावरही काही शेअर केले नाही. उलट तिने आपल्या लग्नासंबंधीचे सारे फोटो-व्हिडीओ हटवून टाकले. त्यानंतर केवळ एकदा तिने आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये थोडा बदल केला. पण त्यानंतर आज स्मृतीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एक मुलाखत देताना दिसत आहे. या मुलाखतीत ती तिच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत बोलताना दिसत आहे. सुरुवातीला ती स्वत:ची ओळख करून देते. त्यानंतर वर्ल्डकप विजयाबद्दल बोलताना ती म्हणते, "आम्ही विश्वविजेता ठरलो हे मला खरंच वाटत नव्हतं. १२ वर्ष क्रिकेट खेळताना दरवेळी वर्ल्डकपमध्ये आम्हाला अपयश येत होते. पण जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा आम्ही लहान मुलांसारखे फोटो काढत राहिलो." तसेच, "फलंदाजीच्या वेळी मी रिलॅक्स होते पण फिल्डिंग करताना मी सगळ्यां देवांची नावं घेत होते", असेही ती म्हणताना दिसते.
लग्नाविषयी पलाशच्या आईने केले मोठे विधान
स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न स्थगित झाले होते. काही दिवसांपूर्वी स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे मानधना कुटुंबासाठी ही दिलासादायक बाब आहे. पण या साऱ्या गोंधळात पलाश मुच्छलची आई अमिता मुच्छल यांचे विधान चर्चेत आले. अमिता म्हणाल्या की सर्व काही नियोजित कार्यक्रमाप्रमाणे होईल. त्यांनी असेही स्पष्ट केले की पलाशचे स्मृतीच्या वडिलांशी खूप जवळचे नाते आहे आणि त्यांची प्रकृती लक्षात घेता, लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण लवकरच विवाहसोहळा पार पडेल.
Web Summary : Amidst wedding postponement rumors, Smriti Mandhana shared an Insta video discussing her cricket journey and World Cup victory. She expressed disbelief at winning after years of setbacks.
Web Summary : शादी स्थगित होने की अफवाहों के बीच, स्मृति मंधाना ने क्रिकेट यात्रा और विश्व कप जीत पर एक इंस्टा वीडियो साझा किया। उन्होंने वर्षों की असफलताओं के बाद जीतने पर अविश्वास व्यक्त किया।