Smriti Mandhana ICC Rankings : भारतीय संघाची उप कर्णधार आणि सलामीची बॅटर स्मृती मानधना ही आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये नंबर वन आहे. आता इंग्लंड दौऱ्यात ती टी-२० क्रिकेटमध्ये अव्वलस्थान पटकवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी मालिकेतील पहिल्याच सामन्यात शतक झळकावत तिने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात अगदी धमाकेदार अंदाजत केलीये. या शतकीसह तिने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणाऱ्या मोजक्या बॅटर्सच्या यादीत स्थान मिळवले. पण टी-२० तील क्वीन होण्यासाठी तिला आणखी थोडा जोर लावावा लागणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिसऱ्या स्थानावर पोहचताच साधला हा डाव
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या नव्या महिला टी-२० क्रमवारीत स्मृती मानधना एका स्थानाच्या सुधारणेसह तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. शतकी खेळीच्या जोरावर टी-२० क्रिकेटमध्ये तिला नंबर वनचा डाव साधता आला नसला तरी स्मृती मानधनाने टी२० कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंसह नवा विक्रम सेट केला आहे. स्मृती मानधनाच्या खात्यात ७७१ रेटिंग पॉइंट्स असून आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हे तिचे सर्वोत्तम रँकिंग आहे.
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
वनडेनंतर टी-२० मध्ये क्वीन होण्याची संधी
आयसीसी महिला टी-२० क्रमवारीतल बाथ मूनी ७९४ रेटिंग पॉइंट्स सह अव्वलस्थानावर आहे. त्यापाठोपाठ या यादीत हेली मॅथ्यू ७७४ रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर दिसते. इंग्लंड दौऱ्यावरील मालिकेत कामगिरीतील सातत्य कायम ठेवून स्मृती मानधना वनडेसह टी-२०तही नंबर होऊ शकते.
इंग्लंडमधील जबरदस्त रेकॉर्डमुळे नंबर वनचा मार्ग सहज सोपा
भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या सामन्यातील शतकी खेळीसह स्मृती मानधनाने या मालिकेची सुरुवात जबरदस्त केली आहे. इंग्लंडच्या मैदानात स्मृतीचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. त्यामुळेच टी-२० क्रिकेटमध्ये नवी क्वीन होण्याचा तिचा मार्ग अगदी सोपा वाटतोय. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर तिने जर टी-२० रँकिंगमध्ये नंबर वनचा ताज पटकवला तर वनडेसह टी २० त दबदबा निर्माण करण्याचा खास विक्रमही तिच्या नावे होईल.