Smriti Mandhana Boyfriend Palash Mucchal Birthday Celebration: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने २२ मे रोजी तिचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छलचा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान दोघेही एकमेकांना केक भरवताना दिसले. पलाशच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड गायक सोनू निगम, प्रसिद्ध अभिनेता शरद केळकर यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली आणि पार्टी खूप एन्जॉय केली. स्मृती मंधाना तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी सोशल मीडियावरही तिचे प्रेम व्यक्त करताना दिसली. तिने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच काही व्हिडीओ पोस्ट करण्यात आले.
मंधानाने असा साजरा केला बॉयफ्रेंडचा वाढदिवस
स्मृती मंधानाने पलाशला वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या. तिने इंस्टाग्रामवर दोघांचे काही रोमँटिक फोटो शेअर करून आपले प्रेम व्यक्त केले. मंधानाने लिहिले, “माझ्या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला जगातील सर्व आनंद मिळो.” त्याचवेळी, पलाशने केक कापतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो मंधानाला केक भरवताना दिसत आहे. यावेळी गायक सोनू निगम आणि बॉलिवूड अभिनेता शरद केळकर देखील दिसले. सोनूनेही पलाशला केक भरवून शुभेच्छा दिल्या.
या दोन्ही पोस्टवर चाहत्यांनीही शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव केला. स्मृती मंधानाने शेअर केलेले फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. अवघ्या काही मिनिटांतच त्याला १ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले. सध्या त्यांच्या पोस्टला १३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक चाहत्यांनी पलाश मुच्छलला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच, काहींनी जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दलही विचारले आहे.
पलाश मुच्छल कोण आहे?
पलाश मुच्छल हा एक गायक आणि संगीतकार आहेत. त्याने अगदी लहान वयातच बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तो इंडस्ट्रीतील सर्वात तरुण संगीतकारांपैकी एक बनला. प्रसिद्ध बॉलिवूड गायिका पलक मुच्छल ही त्याची मोठी बहीण आहे. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा त्याच्या प्रोजेक्ट्स, वैयक्तिक आयुष्याची आणि स्मृती मंधानासोबत घालवलेल्या क्षणांची झलक शेअर करत असतो. पलाश अनेकदा मंधानाला तिच्या सामन्यांदरम्यान स्टेडियममधून पाठिंबा देताना दिसतो.
Web Title: Smriti Mandhana celebrates boyfriend palash muchhal birthday party sonu nigam sharad kelkar bollywood celebrities video viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.