स्मृती मानधना वनडे, टी-२० क्रमवारीत अव्वल तीनमध्ये; गोलंदाजांमध्ये दीप्ती दुसरी

टी- २० फलंदाजांच्या क्रमवारीत ती एका स्थानाच्या प्रगतीसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 09:45 IST2024-12-18T09:44:19+5:302024-12-18T09:45:13+5:30

whatsapp join usJoin us
smriti mandhana among top three in odi t20 rankings | स्मृती मानधना वनडे, टी-२० क्रमवारीत अव्वल तीनमध्ये; गोलंदाजांमध्ये दीप्ती दुसरी

स्मृती मानधना वनडे, टी-२० क्रमवारीत अव्वल तीनमध्ये; गोलंदाजांमध्ये दीप्ती दुसरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

  दुबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजविरुद्ध केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) जाहीर करण्यात आलेल्या महिला वनडे फलंदाजी क्रमवारीत तीन स्थानांच्या प्रगतीसह दुसरे स्थान मिळवले, तर टी- २० फलंदाजांच्या क्रमवारीत ती एका स्थानाच्या प्रगतीसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

डावखुरी फलंदाज मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या सामन्यात १०५ धावांची खेळी केली होती, तर वेस्ट इंडीजविरुद्ध रविवारी मुंबईत पहिल्या टी-२० सामन्यात ५४ धावा केल्या. मानधना एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल १० मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर दोन क्रमांकाच्या नुकसानीसह १३व्या, तर हरलीन देओल नऊ स्थानांच्या प्रगतीसह ६४व्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजी क्रमवारीत दीप्ती शर्मा दोन क्रमांकाच्या नुकसानीसह पाचव्या क्रमांकावर आहे. भारताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी ४८ स्थानांच्या प्रगतीसह ५१व्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर रेणुका ठाकूर २८व्या क्रमांकावरून २६व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

टी-२० गोलंदाजांमध्ये दीप्ती दुसरी 

टी-२० फलंदाजी क्रमवारीत हरमनप्रीतचे अव्वल १०मध्ये पुनरागमन झाले आहे. जेमिमा १५व्या स्थानावर आहे. गोलंदाजीत दीप्ती शर्मा दोन स्थानांच्या प्रगतीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर टिटास साधू ५२व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

 

Web Title: smriti mandhana among top three in odi t20 rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.