SL vs BAN Super Fours Match 1 Live Streaming And Both Team Head To Head Stats And Records In T20I :श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील लढतीसह आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरच्या लढतींना सुरुवात होत आहे. शनिवारी २० सप्टेंबरला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ पुन्हा समोरासमोर येतील. साखळी फेरीतील लढतीत श्रीलंकेच्या संघाने बांगलादेशसह आपल्या गटातील सर्व तीन स्पर्धकांना पराभूत करत दिमाखात सुपर फोरमध्ये प्रवेश निश्चित केलाय. एवढेच नाही तर अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाला पराभूत करत एका अर्थाने श्रीलंकेच्या संघाने बांगलादेशला मदतीचा हात देत आपल्यासोबत सुपर फोरमध्ये नेले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कट्टर प्रतिस्पर्ध्यासाठी टाळ्या वाजवल्या; मॅच संपताच चित्र पालटलं, कारण....
अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील साखळी फेरीतील लढतीत बांगलादेशच्या संघासह त्यांचा चाहतावर्ग हा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या श्रीलंकेच्या संघासाठी टाळ्या पिटताना दिसला. पण या मॅचचा निकाल लागताच चित्र पालटलं. कारण आशियातील दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील वर्चस्वाची लढाई पुन्हा सेट झालीये. आता बांगलादेशचा संघ साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढून मैदान गाजवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ स्पर्धेतील विजयी सिलिसला कायम ठेवून आपला डंका कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. इथं एक नजर टाकुयात या दोन संघातील 'काँटे की टक्कर' कुठं अन् कशी पाहता येईल? कसा आहे दोन्ही संघातील आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हेड टू हेड रेकॉर्ड? यासंदर्भातील सविस्तर माहिती
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
कधी अन् कुठं रंगणार सामना? (When And Where SL vs BAN Match Played?)
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना शनिवारी, २० सप्टेंबर रोजी नियोजित आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री ८ वाजता सामन्यातील पहिला चेंडू फेकला जाईल. याआधी अर्धा तास टॉस होईल. दोन्ही संघ हा सामना जिंकून यंदाच्या हंगामातील फायनलची दावेदारी भक्कम करण्यासाठी जोर लावतील..
श्रीलंका-बांगलादेश यांच्यातील लढत कुठं पाहता येईल? (SL vs BAN Live Streaming And Telecast In India)
आशिया कप स्पर्धेतील सर्व सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क हे सोनी नेटवर्ककडे आहेत. टेलिव्हिजनवर सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर क्रिकेटर चाहते या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय लाईव्ह स्टिमिंगच्या माध्यमातून Sony Liv अॅप आणि वेबसाइटवर देखील सामना पाहता येईल.
- सोनी स्पोर्ट्स टेन १ आणि ५ (Sony Sports Ten 1/Sony Sports Ten 5) (इंग्रजी)
- सोनी स्पोर्ट्स टेन ३ (Sony Sports Ten 3) (हिंदी)
- सोनी स्पोर्ट्स टेन ४ (Sony Sports Ten 4) (तामिळ)
T20-I मध्ये कसा आहे श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड? ( SL vs BAN Head To Head Stats And Records In T20I )
आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये आतापर्यंत हे दोन संघ २१ वेळा समोरा समोर आले आहेत. यात श्रीलंकेचा संघ हा भारी ठरलाय. यंदाच्या आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीतील लढतीसह श्रीलंकेच्या संघाने १३ वेळा बांगलादेशला पराभूत केलं आहे. दुसरीकडे बांगलादेशचा संघान ८ वेळा श्रीलंकेला शह दिलाय.
Web Title: SL vs BAN Live Streaming Where To Watch Todays Asia Cup 2025 Super Fours Match 1 Know Sri Lanka vs Bangladesh Head To Head Stats And Records In T20I
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.