SL vs AFG live Streaming Where to Watch Today's Asia Cup 2025 11th Match : आशिया चषक २०२५ स्पर्धेतील 'अ' गटातून टीम इंडियापाठोपाठ (Team India) पाकिस्तानचा संघ (Pakistan Cricket Team) सुपर फोरसाठी पात्र ठरलाय. दुसरीकडे 'ब' गटातही कमालीची चुरस निर्माण झाली असून श्रीलंका, बांगलादेश या तीन संघांपैकी कोणते दोन संघ स्पर्धेत टिकणार त्याचा निकाल एका सामन्यावर ठरणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रीलंका सेफ; अफगाणिस्तान अन् बांगलादेशला स्पर्धेतून Out होण्याचा धोका! ते कसं?
अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तानच्या संघाची लढत ही श्रीलंकेविरु होणार असली तरी त्यांचा खरा सामना बांगलादेशसोबत असेल. कारण जर अफगाणिस्तानचा संघ जिंकला तर राशिद खानच्या नेतृत्वाखालील संघाच्या खात्यात ४ गुण जमा होतील. दुसरीकडे श्रीलंका आणि बांगलादेश संघाच्या खात्यातही तेवढेच गुण दिसतील. या परिस्थितीत अफगाणिस्तान संघ उत्तम नेट रनरेटच्या जोरावर या गटात टॉपला पोहचेल. दुसरीकडे सामना गमावल्यावरही श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिल अन् बांगलादेशचा खेळ खल्लास होईल. इथं एक नजर टाकुयात कमालीचं ट्विस्ट निर्माण झालेला सामना कुठं अन् कसा पाहता येईल? कसा आहे अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचा एकमेकांविरुद्धचा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हेड टू हेड रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती....
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
कुठं अन् कसा पाहता येईल SL vs AFG यांच्यातील सामना? (Sri Lanka vs AFG Live Streaming And Telecast)
भारतात आशिया चषक स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रेक्षपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याशिवाय मोबाईलच्या माध्यमातून SonyLiv अॅप आणि वेबसाईटवर स्ट्रिमिंगसह फॅनकोडवरही श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याचा आनंद क्रिकेट चाहत्यांना घेता येईल.
कसा आहे PAK vs UAE यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड? (SL vs AFG Head to Head Records In T20I)
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे दोन संघ ८ वेळा एकमेकांना भिडले आहेत. यात श्रीलंकेचा संघ अफगाणिस्तानवर भारी पडलाय. ५ सामन्यात श्रीलंकेन मैदान मारलय. अफगाणिस्तानच्या संघानं फक्त ३ सामन्यात विजय मिळवला आहे. आपला हा रेकॉर्ड सुधारण्यासोबत स्पर्धेत टिकून राहण्याच्या इराद्याने अफगाणिस्तानचा संघ मैदानात उतरेल.
Web Title: SL vs AFG live Streaming Where to Watch Today's Asia Cup 2025 11th Match Know Sri Lanka vs Afghanistan Head to Head Stats And Records In T20I
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.