Shubman Gill Tweet On Swiggy: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी नुकतेच मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर $44 अब्जांना विकत घेतले. या करारानंतर अनेकांनी मस्क यांना आणखी काही कंपन्या खरेदी करण्याचे आवाहन केले. भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिलदेखील इलॉन मस्क यांना खास आवाहन करताना दिसला. पण, त्याचे ट्विट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.
शुभमन गिलचे आवाहन
शुभमन गिलने ट्विट करुन इलॉन मस्क यांना फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी(Swiggy) खरेदी करण्याचे आवाहन केले. शुभमन गिलने(Shubman Gill) 29 एप्रिल रोजी रात्री 11.01 वाजता ट्विट केले, ज्यात त्यांने एलोन मस्क यांना केले की, 'इलॉन मस्क, कृपया स्विगी खरेदी करा, जेणेकरून ते वेळेवर जेवण पोहोचवू शकतील.' या ट्विटमध्ये त्याने इलॉन मस्कला टॅगही केले.
शुभमन गिलचे ट्विट:-
स्विगीचे उत्तर
शुभमन गिलच्या या ट्विटला इलॉन मस्क यांनी प्रतिसाद दिला नसला तरी स्विगीने उत्तर दिले आहे. स्विगीने ट्विट केले, हाय शुभमन, ट्विटर किंवा नो ट्विटर, आम्हाला तुझ्या ऑर्डरबाबत सर्वकाही योग्य हवे आहे. तुझे डिटेल्स आम्हाला DM कर, आम्ही योग्य पाऊले उचलूत. यानंतर स्विगीने आणखी एक ट्विट केले, ज्यात त्यांना शुभमनचा संदेश मिळाल्याची माहिती दिली.
स्विगीचे ट्विट:-
चाहत्यांनी गिलला केले ट्रोल
आयपीएल 2022 मध्ये गिलची कामगिरी फारशी खास राहिली नाही. गिलने या मोसमात आतापर्यंत 8 सामन्यात 229 धावा केल्या आहेत. त्याच्या या ट्विटनंतर चाहते त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'स्विगी अजूनही तुझ्या टी20 फलंदाजीपेक्षा वेगवान आहे.' तर एका चाहत्याने लिहिले, 'चुकीची खरेदी होत राहते, तुझीही होती.'
व्हायरल ट्विट पहा:-