IND vs WI 2nd Test Shubman Gill hands first Test trophy to this Indian Youngster Video : घरच्या मैदानातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिके आधीच इंग्लंड दौऱ्यातून शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी पर्वाची सुरुवात झाली. इंग्लंड दौऱ्यातील तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी अंतर्गत खेळवण्यात आलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-२ बरोबरीचा डाव साधल्यावर भारतीय संघाच्या नव्या कर्णधाराने सातव्या सामन्यातील विजयासह गौतम गंभीराला बर्थडे गिफ्ट दिलं. दिल्लीच्या मैदानातील सामना शुबमन गिलसाठी एकदम खास राहिला कारण त्याच्या बाबतीत ७ या लकी आकड्याचा कमालीची योगायोग जुळून आला. याशिवाय पहिली ट्रॉफी जिंकल्यावर शुबमन गिलनं धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण त्यानंतर एक वेगळ चित्रही पाहायला मिळालं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सात लक फॅक्टर अन्क मालीचा योगायोग!
शुबमन गिल सात हा आकडा आपल्यासाठी लकी मानतो. त्यामुळेच तो ७७ क्रमांकाची जर्सी घालून मिरवतो. कारकिर्दीतील सातव्या कसोटी सामन्यात शुबमन गिलनं पहिला टॉस जिंकला. ही मॅच ७ विकेट राखून जिंकत टीम इंडियाने एका संघाला सर्वाधिक १० वेळा पराभूत करत वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी करत मालिका २-० अशी जिंकली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या हस्ते शुभमन गिलनं आपल्या कॅप्टन्सीतील पहिली ट्रॉफी स्विकारली. त्यानंतर टीम इंडियातील विजयाचा माहोल बघण्याजोगा होता. याशिवाय एक खास गोष्ट दिसून आली. पहिली ट्रॉफी जिंकल्यावर शुबमन गिलनं धोनी- विराट-रोहित यांच्या कॅप्टन्सीत जी परंपरा चालत आली होती ती परंपरा जपली. त्याने ट्रॉफी युवा चेहऱ्याच्या हाती सोपवली. पण त्यानंतर अनुभवी खेळाडूची मिजास दिसून आली.
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
गिलनं जपली धोनी-विराट-रोहितची परंपरा! पण...
महेंद्रसिंह धोनीच्या काळात कोणत्याही स्पर्धेची ट्रॉफी जिंकली की, धोनी ट्रॉफी संघातील युवा चेहऱ्याच्या हाती सोपवताना पाहायला मिळाले होते. त्याची जागा घेतल्यावर आधी विराट कोहलीनं आणि मग रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीही हीच परंपरा जपली गेली. आता तोच कित्ता शुबमन गिलनंही गिरवला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यात बाकावर बसून असलेल्या नारायण जगदीशन याच्या हाती गिलनं ट्रॉफी सोपवली. मग अनुभवी ऑलराउंडर आणि उप कर्णधार रवींद्र जडेजा युवा खेळाडूच्या हातातील ट्रॉफी घेत ती उंचावताना दिसून आले.