Join us

विराटनंतर शुबमन गिलच होणार भारताचा कर्णधार; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमनने दाखवलेला आक्रमकपणातून त्याचं भविष्य लक्षात येतं.

By मोरेश्वर येरम | Updated: January 20, 2021 18:02 IST

Open in App

भारतात आणि क्रिकेट विश्वात सध्या एकच चर्चा सुरूय ती म्हणजे भारताच्या युवा दमाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयाची. यात आता युवा खेळाडूंच्या भवितव्याबाबतही मोठी विधानं केली जात आहेत. ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियन भेदक माऱ्यासमोर टिच्चून फलंदाजी करत ९१ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारणाऱ्या भारताच्या युवा फलंदाज शुबमन गिलच्या खेळीने काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर खूश झाले आहेत. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमनने दाखवलेला आक्रमकपणातून त्याचं भविष्य लक्षात येतं. विराट कोहलीनंतर शुबमन गिलच भारतीय संघाचा कर्णधार होईल, असं भाकित शशी थरूर यांनी केलं आहे. 

"ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर एखाद्या जुन्याजाणत्या खेळाडूप्रमाणं शुबमन गिल या २१ वर्षीय खेळाडूनं फलंदाजी केली. याच पद्धतीनं येत्या काही वर्षांमध्ये त्याच्याकडून अशीच कामगिरी पाहायला मिळाली तर विराट कोहलीनंतर तोच भारतीय संघाचा कर्णधारपदी पाहायला मिळेल", असं थरूर म्हणाले. 

VIDEO: रिषभ पंत स्टम्पमागे गात होता भन्नाट गाणं; ऐकून पोट धरून हसाल...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमनला भारतीय संघात संधी मिळाली. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात गिलने ४५ धावांची खेळी साकारली. पुढे चौथ्या कसोटीत ९१ धावांची खणखणीत खेळी साकारून भारताच्या विजयात खारीचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियात दौऱ्यात गिलने एकूण ६ डावांमध्ये २५९ धावा केल्या आहेत. यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शुबमन चौथ्या स्थानी आहे. 

"शुबमनच्या फलंदाजीत मनमोहून टाकतील असे फटके पाहायला मिळाले. अवघ्या २१ वर्षांच्या मुलानं ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर दाखवलेला संयमीपणा आणि आत्मविश्वास हे मला विशेष भावलं. त्याच्याभोवती नकारात्मकतेचं वातावरण जाणवत नाही. त्याच्या एकंदर देहबोलीतही अनिश्चितता किंवा अतिशयोक्तीची कोणतीची चिन्ह नाहीत", असा कौतुकाचा वर्षाव थरूर यांनी केला आहे. 

अनवाणी पायांनी गोलंदाजी...ते 'ब्रिस्बेन'चा सिकंदर; मोहम्मद सिराजची अविश्वसनीय कहाणी

ब्रिस्बेन कसोटीत साकारलेली ९१ धावांची खेळी शुबमनची आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वाच्च खेळी ठरली आहे. शुबमनने सलामीवीर रोहित शर्मासोबत भारतीय संघाच्या डावाची सुरुवात केली होती. रोहित स्वस्तात माघारी परतल्यानंतरही कोणताही दबाव न घेता शुबमनने सहजसुंदर फलंदाजी केली आणि भारताच्या विजयाचा पाया रचला होता.  

टॅग्स :शुभमन गिलविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशशी थरूर