Ranji Trophy : गिलच्या पदरी भोपळा! टीम इंडियात कमबॅकसाठी सरफराज खानने शतकी खेळीसह ठोकला शड्डू

वनडेत घरच्या मैदानात मालिका गमावली, आता गिल देशांतर्गत क्रिकेटमध्येही फेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:21 IST2026-01-22T19:20:05+5:302026-01-22T19:21:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Shubman Gill Fails On Ranji Trophy Return With Two Ball Duck Sarfaraz Khan Continues To Shine For Mumbai Smashes Blistering Hundred vs Hyderabad | Ranji Trophy : गिलच्या पदरी भोपळा! टीम इंडियात कमबॅकसाठी सरफराज खानने शतकी खेळीसह ठोकला शड्डू

Ranji Trophy : गिलच्या पदरी भोपळा! टीम इंडियात कमबॅकसाठी सरफराज खानने शतकी खेळीसह ठोकला शड्डू

एका बाजूला भारतीय संघ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी न्यूझीलंडविरुद्ध क्रिकेटच्या छोट्या प्रारुपात धमाका करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दुसरीकडे या स्पर्धेचा भाग नसलेले स्टार क्रिकेटर देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी स्पर्धेत धमक दाखवण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

वनडेत घरच्या मैदानात मालिका गमावली, आता गिल देशांतर्गत क्रिकेटमध्येही फेल 

घरच्या मैदानात कॅप्टन्सीत वनडे गमावण्याची नामुष्की ओढावल्यावर आता शुभमन गिल पंजाबचे नेतृत्व करताना फलंदाजीत फोल ठरला आहे. सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात २ चेंडूत खातेही न उघडता तंबूत परतण्याची वेळ त्याच्यावर आली. दुसऱ्या बाजूला ज्या मुंबईकराकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे त्या पठ्ठ्यानं मुंबई संघाकडून मैदानात उतरत हैदराबाद विरुद्ध कडक शतकी खेळीसह पुन्हा एकदा कसोटी संघात कमबॅकसाठी शड्डू ठोकला आहे. 

 सरफराजचा आणखी एक हिट शो

रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या हंगामातील ग्रुप-डीचा एक रोमहर्षक सामना २२ जानेवारीपासून हैदराबादच्या मैदानात सुरु झाला. या सामन्यात मुंबईचा मध्य फळतील फलंदाज सरफराज खान याने शतकी खेळीसह एक मोठा डाव साधला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ५००० धावांचा पल्ला गाठत देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपल्यातील धमक दाखवून दिली आहे. 

१४२ धावांची नाबाद खेळी 

मुंबईकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला सरफराज खान याने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवसाअखेर  १६४ चेंडूंचा सामना करत ८६.५८ च्या स्ट्राइक रेटसह १४२ धावा केल्या होत्या. या नाबाद खेळीत त्याने ११ चौकार आणि ५ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. 

सरफराजची 'फर्स्ट क्लास' कामगिरी

सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६१ सामने खेळले आहेत. यातील ९१ डावांत ६३.१५ च्या सरासरीने त्याने ५००५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १७ शतके आणि १६ अर्धशतकांची नोंद आहे. नाबाद ३०१ धावा ही त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी आहे.

टीम इंडियात संधी मिळाली, पण...

देशांतर्गत क्रिकेटमधील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर सरफराज खानने टीम इंडियात एन्ट्री मारली. पण त्याला सातत्यपूर्ण संधी मिळाली नाही. आतापर्यंत त्याने ६ कसोटी सामने खेळले असून ११ डावांत त्याने ३७.१० च्या सरासरीसह ३७१ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १ शतक आणि ३ अर्धशतके आहेत. तो पुन्हा कसोटी संघात कमबॅसाठी धमाकेदार कामगिरी करून दाखवताना दिसत आहे.

Web Title : रणजी ट्रॉफी: गिल विफल, सरफराज खान का शतक, वापसी के लिए ठोका दावा

Web Summary : रणजी ट्रॉफी में शुभमन गिल का निराशाजनक प्रदर्शन, सरफराज खान ने शतक जड़कर टेस्ट टीम में वापसी का दावा ठोका। हैदराबाद के खिलाफ दमदार प्रदर्शन से प्रथम श्रेणी क्रिकेट में अपनी क्षमता दिखाई।

Web Title : Ranji Trophy: Gill fails; Sarfaraz Khan slams ton for comeback.

Web Summary : Shubman Gill falters in Ranji Trophy as Sarfaraz Khan shines with a century, boosting his chances for a Test team comeback with a strong performance against Hyderabad, showcasing his first-class cricket prowess.