Join us

रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा

Rohit Sharma Captain: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहितला कर्णधारपदावरून काढल्याने चाहते नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:20 IST

Open in App

Rohit Sharma Captain: भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. त्यात रोहित शर्माला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवून ती जबाबदारी शुबमन गिलकडे देण्यात आली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही संघात केवळ फलंदाज म्हणून स्थान देण्यात आले. या प्रकारानंतर सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे. तशातच आता खुद्द शुबमन गिलने पत्रकार परिषदेत एक मोठा खुलासा केला.

हेही वाचा- "अजित आगरकरचा शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लिश खेळाडूचं विधान

शुभमन गिलने धक्कादायक माहिती उघड केली की, रोहित शर्मा याला वनडे कर्णधार पदावरून हटवण्याचा निर्णय होणार असल्याची त्याला आधीपासूनच माहिती होती. गिलने मीडिया समोर म्हटले की, अहमदाबादमधील टेस्ट मालिकेदरम्यानच वनडे टीम कर्णधार बदलला जाणार हे त्याला सांगण्यात आले होते. कसोटी मालिका सुरू असली तरीही, हे असेच होणार याची त्याला आधीच कल्पना देण्यात आली होती. "कसोटी सामन्याच्या वेळी ही घोषणा झाली होती, पण मला त्याबद्दल आधीच माहिती होती. ही एक मोठी जबाबदारी आणि सन्मान आहे. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये माझ्या देशाचे नेतृत्व करण्यास तयार आहे. गेल्या काही महिन्यांपासून माझ्यासाठी उत्साहवर्धक काळ आहे आणि मी भविष्यासाठीही सज्ज आहे," असे गिल पत्रकार परिषदेत म्हणाला.

हेही वाचा- रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?

यातून असे दिसते की, भारतीय संघातील महत्त्वाच्या निर्णयापूर्वी टीम व्यवस्थापन, मुख्य निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि शुबमन गिल यांच्यात चर्चा झाली असावी. कारण रोहितला हटवण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काहींचे म्हणणे आहे की त्याला भविष्यात वनडे विश्वचषकापर्यंत संघातूनही वगळले जाऊ शकते. परंतु शुभमनने हेही स्पष्ट केलं की, अजूनही रोहित आणि विराट या दोघांची वनडे संघाला गरज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तीन वनडे सामन्यांमध्ये रोहित आणि विराट दोघेही खेळतील. या खुलाश्यानंतर रोहित शर्माच्या क्रिकेटमधील भविष्यासंबंधी असंख्य चर्चा रंगल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Sharma's captaincy was known in advance: Big revelation

Web Summary : Shubman Gill revealed he knew beforehand about Rohit Sharma's captaincy removal. He stated that this decision was communicated during the Ahmedabad Test series. Rohit and Virat will play in the ODIs.
टॅग्स :रोहित शर्माशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघअजित आगरकर