Shubman Gill Press Conference Before IND vs ENG 4th Test : इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. २३ जुलै पासून रंगणाऱ्या या कसोटी आधी भारतीय ताफ्यात दुखापतीचं ग्रहण लागले. परिणामी चौथ्या आणि मालिकेत बरोबरी साधण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या लढतीत भारतीय संघ नव्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. मँचेस्टरच्या मैदानातील कसोटी आधी शुबमन गिलनं पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने संघात लेट एन्ट्री झालेल्या अंशुल कंबोज याला कसोटी पदार्पणाची संधी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. इथं जाणून घेऊयात शुबमन गिल नेमकं काय म्हणाला? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आकाश दीप 'आउट'; त्याच्या जागी कुणाला मिळणार संधी?
मँचेस्टर कसोटी सामन्यासाठी आकाश दीपही निवडीसाठी उपलब्ध असणार नाही, ही माहिती कर्णधार शुबमन गिलनं दिली. यावर त्याला तिसरा गोलंदाज कोण असेल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कर्णधारानं अंशुल कम्बोज किंवा प्रसिद्ध कृष्णा या दोघांपैकी एकाला संधी मिळणार असल्याचे सांगितले. त्याने थेट कंबोजचं नाव घेतलं नसले तरी युवा जलदगती गोलंदाजाला पदार्पणाची संधी मिळणार याची हिंटच शुबमन गिलनं दिली आहे.
करुण नायरची 'घरवापसी'! टीम इंडियात कमबॅकची संधी मिळाल्यावर दाखला ठेंगा
गोलंदाजीसह फलंदाजीतही उपयुक्त ठरू शकतो हा चेहरा
नितीश कुमार रेड्डी उर्वरित मालिकेतून आउट झाला आहे. अर्शदीप आणि आकाश दीप यांच्या दुखापतीच्या समस्येमुळे टीम इंडियाने अंशुल कंबोज याला संघात सामील करून घेतले आहे. अंशुल कंबोजनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७९ विकेट्स घेतल्या आहेत. एका डावात १० विकेट्स घेण्याचा महा पराक्रमही त्याच्या नावे आहे. एवढेच नाही तर तो गोलंदाजीसह फलंदाजीतही उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णा ऐवजी त्यालाच पहिली पसंती दिली जाईल, असे चित्र निर्माण झाले आहे.
पंतसंदर्भातही दिली अपडेट
शुबमन गिलनं चौथ्या कसोटी सामन्यात रिषभ पंत खेळणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. रिषभ पंत बोटाच्या दुखापतीतून सावरला असून तो चौथ्या कसोटीसाठी फिट असल्याचे शुबमन गिलनं म्हटले आहे. त्यामुळेच तोच विकेट किपर बॅटरच्या रुपात संघात दिसेल, हे आता स्पष्ट झाले आहे. याआधी पंतच्या जागी ध्रुव जुरेल प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसू शकतो, अशी चर्चा रंगली होती.
करुण नायरला पुन्हा मिळणार संधी
८ वर्षांनी टीम इंडियात कमबॅकची संधी मिळालेल्या करुण नायर पहिल्या ३ सामन्यात अपयशी ठरला. ६ डावात फक्त १३२ धावा केल्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यातून त्याचा पत्ता कट होऊ शकतो, अशी चर्चा रंगली होती. पण गिलनं त्याच्या संघातील स्थानाला धोका नसल्याचीही पुष्टी केली. करुण नायर हा धावांसाठी संघर्ष करत असला तरी त्याच्या कामगिरीत सुधारणा होईल, असा विश्वास संघ व्यवस्थापनासह कॅप्टनला आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा मैदानात उतरणार हे देखील स्पष्ट झाले आहे.