Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ : श्रेयस अय्यरला मोठा दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत खेळण्याचा मार्ग झाला मोकळा

संघात निवड होऊनही खेळणार तो मैदानात उतरणार की नाही त्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 18:20 IST

Open in App

Shreyas Iyer Fitness IND vs NZ ODI 2026 : भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय संघ ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानातील वनडे मालिकेसह नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात श्रेयस अय्यरची निवड झाली होती. एवढेच नाही तर त्याच्याकडे पुन्हा उप कर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली. पण या मालिकेतील त्याची उपलब्धता ही फिटनेसवर अवलंबून असेल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी फिट

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरचा रिहॅब पूर्ण झाला आहे. सेंट्रल ऑफ एक्सलन्स (COE) चे प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना ई-मेलच्या माध्यमातून अय्यरचा रिहॅब यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती कळवली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तो पुन्हा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. 

"पैशांपेक्षा देश मोठा"; मुंबईत शिकलेल्या स्टार अँकरने बांगलादेशच्या क्रिकेट करारावर मारली लाथ

दुखापतीमुळे संघाबाहेर पडला, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकला ३१ वर्षीय श्रेयस अय्यरला गत वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकला.पण आता तो पुनरागमनासाठी सज्ज आहे.  अय्यरने आपल्या रिहॅबिलिटेशनच्या शेवटच्या टप्प्यासाठी COEमध्ये १० दिवस घालवले. तब्बल तीन महिन्यांनंतर तो विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यातून क्रिकेटच्या मैदानात उतरला. मुंबई संघाचे नेतृत्व करताना त्याने फलंदाजीतील धमकही दाखवली. हिमाचल प्रदेश विरुद्धच्या  सामन्यात अय्यरनं ८२ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. 

IND vs NZ ODI 2026 वनडे मालिकेसाठी दोन्ही  संघ 

भारत

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल.

न्यूझीलंड 

मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), आदी अशोक, क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉन्वे, जॅक फॉल्क्स, मिच हे, काइल जेमीसन, निक केली, जेडन लेनॉक्स, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल रे, विल यंग.

IND vs NZ ODI मालिकेचे वेळापत्रक

English
हिंदी सारांश
Web Title : Shreyas Iyer fit for New Zealand ODIs, clearance received!

Web Summary : Shreyas Iyer is fit for the New Zealand ODI series after recovering from injury. He was cleared by VVS Laxman, paving the way for his return to the squad as vice-captain. The series begins January 11th.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडश्रेयस अय्यरभारतीय क्रिकेट संघ