Shreyas Iyer Takes Break Out Of India A vs Australia A Series : आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात स्थान न मिळालेल्या श्रेयस अय्यरला बीसीसीआयने कॅप्टन्सीचं गिफ्ट दिलं. ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या चार दिवसीय कसोटी सामन्यात तो भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व करताना दिसला. पण फलंदाजीतील कर्तृत्व दाखवून देण्यात तो कमी पडला. लखनौच्या मैदानात दोन्ही संघातील दुसरा सामना २३ सप्टेंबरपासून रंगणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला आहे. श्रेयस अय्यरनं संघाची साथ सोडून मुंबईला परतला असून आता त्याच्या जागी ध्रुव जुरेल भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लखनौमधील मॅच आधी श्रेयस अय्यर मुंबईला परतला
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरनं मुंबईला परतला असून दुसऱ्या सामन्यात विकेट किपर बॅटर ध्रुव जुरेल संघाचे नेतृत्व करताना दिसले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील त्याच्याकडे भारतीय 'अ' संघाच्या उप कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. श्रेयस अय्यरनं ब्रेक घेणार असल्याची माहिती देताना घरच्या मैदानात रंगणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडीसाठी उपलब्ध असेन, असेही बीसीसीआय निवडकर्त्यांना कळवले आहे, असा उल्लेख या वृत्तामध्ये करण्यात आलाय.
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
रेड बॉल क्रिकेटमध्ये दिसली नाही अय्यरची जादू
ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या पहिल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरला फलंदाजीत चमक दाखवता आली नव्हती. १३ चेंडूत फक्त ८ धावा करून तो बाद झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील ऑफ स्पिनर कोरी रोचिसिओली याने त्याची विकेट घेतली होती. या लढती आधी तो देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभाग संघाकडून खेळताना दिसला होता. या सामन्यातही तो फिकाच ठरला. सेमीफायनल लढतीत पहिल्या डावात २५ आणि दुसऱ्या डावात अवघ्या १२ धावांवर तो बाद झाला होता.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला कमबॅकची संधी मिळणार करणार?
३० वर्षीय श्रेयस अय्यरनं २०२१ मध्ये कसोटी संघात पदार्पण केले. आतापर्यंत त्याने १४ कसोटी सामन्यात ३६.६६ च्या सरासरीनं ८११ धावा केल्या आहेत. मध्यफळीतील फलंदाजाने २०२४ मध्ये भारतीय संघाकडून विशाखापट्टणमच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याला पुन्हा कसोटी संघात पुनरागमनाची संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Shreyas Iyer Takes Break Out Of India A vs Australia A Series Dhruv Jurel To Take Over Captancy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.