Shreyas Iyer Has Been Appointed Captain Of The Mumbai VHT 2025-26 : भारताचा मध्यफळीतील भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेच्या तयारीसाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे कर्णधाराच्या रुपात तो मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. विजय हजारे ट्रॉफीतील उर्वरित सामन्यांसाठी मुंबई संघाच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे. नियमित कर्णधार शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रेयस अय्यर कॅप्टन्सीसह करणार कमबॅक
गत वर्षी ऑक्टोबरमध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर संघाबाहेर होता. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी त्याचे संघात पुनरागमन झाले. त्याच्याकडे पुन्हा उप कर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली. त्याआधी तो विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
शार्दुलच्या जागी मिळाली मुंबई संघाचे नेतृत्व करण्याची संधी
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईचे मुख्य निवड समिती अध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, "शार्दुलला दुखापत झाली असून त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आमच्याकडे शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादवसारखे खेळाडू उपलब्ध आहेत आणि उर्वरित सामन्यांसाठी श्रेयस अय्यरची मुंबईच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे."
टीम इंडियात स्थान मिळाले, पण...
वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा उपकर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरची न्यूझीलंडविरुद्ध वडोदऱ्यात ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, त्याची उपलब्धता पूर्णपणे फिटनेसवर अवलंबून असेल. या मालिकेतील उर्वरित दोन सामने १४ जानेवारीला राजकोट आणि १८ जानेवारीला इंदूर येथे खेळवले जाणार आहेत. त्याआधी श्रेयस अय्यर मंगळवारी हिमाचल प्रदेशविरुद्धच्या ग्रुप सीमधील लढतीसह ८ जानेवारी रोजी पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबई संघाचे नेतृत्व करणार आहे. या सामन्यात तो कशी कामगिरी करतोय त्याकडे सर्वांच्या नजरा असतील.