आशिया कप टी-२० स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. यूएईच्या मैदानात रंगणाऱ्या या मोठ्या स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात श्रेयस अय्यरला स्थान का नाही? हा मुद्दा चांगलाच गाजला. आशिया कप स्पर्धेतून नाव वगळलेल्या श्रेयस अय्यरला BCCI नं ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या मालिकेसाठी संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला. या संघाची कॅप्टन्सी देण्याऐवजी BCCI निवडकर्त्यांनी आशिया कप स्पर्धेसाठी त्याला संधी द्यायला हवी होती, असा सूरही सोशल मीडियावर उमटल्याचे पाहायला मिळाले. या चर्चित मुद्यावर आता खुद्द श्रेयस अय्यरनं पहिल्यांदाच आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवलीये. भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व मिळाल्यावर तो दु:ख विसरला का? नेमकं काय म्हणाला श्रेयस अय्यर जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिया कप स्पर्धेत स्थान मिळाले नाही, मनाचा मोठेपणा दाखवत श्रेयस अय्यर म्हणाला की,...
श्रेयस अय्यरनं आईक्यूओओ पोडकास्ट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक विषयावर भाष्य केले. यावेळी आशिया कप स्पर्धेत संघात स्थान न मिळाल्याबद्दलची मनातील नाराजीही त्याने बोलून दाखवली. तो म्हणाला की, ज्यावेळी तुम्ही अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्याचे हक्कदार असता, त्यावेळी संघात निवडही न होणं हे अधिक नाराशजनक वाटते. ज्यावेळी तुम्हाला माहिती असते की, संघातील कोणीतरी सातत्याने चांगली कामगिरी करतोय, तो आपले सर्वोत्तम देतोय त्यावेळी तुम्ही त्या सहकारी खेळाडूला अन् आपल्या संघाला पाठिंबा देता, असे म्हणत नाराजी असली तरी भारतीय संघाला अन् संघातील सहकारी खेळाडूंना सपोर्ट करणार असे म्हणत त्याने मनाचा मोठेपणा दाखवून दिलाय.
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
कुणाला दाखवण्यासाठी काही करायचं नाही तर...
ज्यावेळी तुम्हाला कोणी पाहत नसते त्यावेळीही आपले काम प्रामाणिकपणे करायलं हवे, असे सांगत टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करत राहिन, असेही त्याने म्हटले आहे. टीम इंडियातूनच नव्हे तर BCCI च्या करारातून आउट झाल्यावर श्रेयस अय्यरनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करुन दाखवली. आयपीएलमध्येही त्याने नेतृत्वाची छाप सोडली. याच प्रामाणिक प्रयत्नाच्या जोरावर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून त्याने टीम इंडियात एन्ट्री मारली होती. पण इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेनंतर आशिया कप स्पर्धसाठीच्या भारतीय टी-२० संघात तो आपले स्थान मिळवून शकला नाही. कामगिरीत सातत्य राखून संधी मिळेल, त्यावेळी सोनं करायची धमक त्याच्यात आहे. पण ही संधी त्याला कधी मिळणार ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Shreyas Iyer Expresses Heartbreak Over Asia Cup Snub Shares Big Statement On Squad Exclusion 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.