Shreyas Iyer Captain India A Squad Against Australia A : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ऑस्ट्रिलिया 'अ' विरुद्ध घरच्या मैदानात रंगणाऱ्या दोन सामन्यांच्या चारदिवसीय मालिकेसाठी BCCI नं शनिवारी भारतीय 'अ' संघाची घोषणा केली. आशिया कप स्पर्धेतून वगळल्यामुळे चर्चेत आलेल्या श्रेयस अय्यर या मालिकेत भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिया कप स्पर्धेसाठी संघाबाहेर ठेवलेल्या अय्यरसंदर्भात BCCI नं दिला खास संदेश
अय्यरला आशिया कप स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले नव्हते. टी-२० फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करूनही बीसीसीआयने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा चांगलीच गाजली. या दरम्यान देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभाग संघाकडून खेळत असलेल्या श्रेयस अय्यरला बीसीसीआयने भारतीय 'अ' संघाचा कर्णधार करत त्याच्या कामगिरीवर नजर असून योग्य वेळी योग्य जबाबदारी त्याला दिली जाईल, असा काहीसा संदेश बीसीसीआयनं या संघ निवडीसह दिला आहे.
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
ध्रुव जुरेल उप कर्णधार, या संघात एन. जगदीशनलाही मिळालं स्थान
ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या मल्टी डे स्पर्धेसाठी विकेट किपर बॅटर ध्रुव जुरेल याच्याकडे उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच्याशिवाय एन जगदीशन यालाही संघात स्थान मिळाले आहे. दुलीप करंडक स्पर्धेतील उत्तर विभाग संघाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये जगदीशन याने दक्षिण विभाग संघाकडून १९७ धावांची लक्षवेधी खेळी केली होती. याशिवाय युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी आणि नितीश कुमार रेड्डी यांचाही भारतीय 'अ' संघात समावेश आहे.
दुसऱ्या सामन्यात केएल राहुल अन् सिराजही उतरणार मैदानात
आशिया कप स्पर्धेनंतर भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत २ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात लोकेश राहुल आणि मोहम्मद सिराज हे दोन स्टार खेळाडूही मैदानात उतरतील. पहिल्या सामन्यानंतर दोघांना रिलीज करून या दोघांचा संघात समावेश करण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया 'अ' संघाचा भारत दौरा
१६ ते १९ सप्टेंबर : पहिली सामना, लखनौ, सकाळी साडे नऊ वाजता २३- २६ सप्टेंबर: दुसरा सामना, लखनौ, सकाळी साडे नऊ
ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय 'अ' संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, एन. जगदीसन (विकेट किपर/बॅटर), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (विकेट किपर/बॅटर), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, मनुश खलील, यार अहमद, शुक्ल रेशम.