IPL 2025 : अविश्वसनीय! आयपीएलच्या इतिहासात कुणाला जमलं नाही ते श्रेयस अय्यरनं करून दाखवलं

याआधी ४ स्टार क्रिकेटर्संनी श्रेयस अय्यरप्रमाणे तीन वेगवेगळ्या फ्रँयायझी संघाचे नेतृत्व केले, पण अशी कामगिरी कुणालाही जमलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:16 IST2025-03-26T17:04:53+5:302025-03-26T17:16:24+5:30

whatsapp join usJoin us
Shreyas Iyer Becomes 1st Player To Smash Fifty Plus Score For 3 Different Teams As Captain In IPL | IPL 2025 : अविश्वसनीय! आयपीएलच्या इतिहासात कुणाला जमलं नाही ते श्रेयस अय्यरनं करून दाखवलं

IPL 2025 : अविश्वसनीय! आयपीएलच्या इतिहासात कुणाला जमलं नाही ते श्रेयस अय्यरनं करून दाखवलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल स्पर्धेतील १८ व्या हंगामात नव्या फ्रँचायझी संघाचे नेतृत्व करताना श्रेयस अय्यरने कमालीची कामगिरी करून दाखवली. दमदार खेळीसह त्याने आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरनं नाबाद ९७ धावांची खेळी केली. या खेळीसह श्रेयस अय्यरनं  एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. आयपीएलमध्ये ३ वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून फ्रँचायझी करताना अर्धशतक झळकवण्याचा पराक्रम त्याने करून दाखवलाय. याआधी अशी कामगिरी कुणालाही जमलेली नाही.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

IPL मध्ये ३ वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाचे नेतृत्व करताना अर्धशतकी खेळी

पंजाब किंग्ज संघाचे नेतृत्व करण्याआधी श्रेयस अय्यरनं गत हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून दिले होते. गत हंगामात दोन वेळा त्याने ५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. याशिवाय २०२२० च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना त्याच्या भात्यातून अर्धशतक आल्याचे पाहायला मिळाले होते. आयपीएलच्या इतिहासातील तो पहिला असा खेळाडू आहे ज्याने तीन वेगवेगळ्या फ्रँचायझीचे नेतृत्व करताना अर्धशतक झळकावले आहे. 

"माझ्या शतकाचा विचार करू नको, तू…’’, संघहितासाठी श्रेयसने शतकावर पाणी सोडलं, शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?...

अय्यरशिवाय ३ फ्रँचायझी संघाचे चौघांनी नेतृत्व केले, पण..

श्रेयस अय्यरशिवाय अजिंक्य रहाणे, कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि स्टीव स्मिथ या चार दिग्गजांनी आयपीएलमध्ये तीन  वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाचे नेतृत्व केले आहे. पण यातील कुणालाही श्रेयस अय्यरसारखी कामगिरी करता आलेली नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली  दिल्ली कॅपिटल्स संघ फायनलही खेळला होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं त्याच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले. दोन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांना फायनलपर्यंत नेणारा तो एकमेव कॅप्टन आहे. 

धोनीच्या विक्रमाशी बरोबरी डेविड वॉर्नरसह किंग कोहलीचाही रेकॉर्ड मोडला

पंजाब किंग्ज संघाचने नेतृत्व करताना श्रेयस अय्यरनं आयपीएल स्पर्धेत ४१ वा विजय नोंदवला. डेविड वॉर्नरला मागे टाकत आता श्रेयस अय्यरने सर्वाधिक आयपीएल सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहचलाय.  सर्वाधिक आयपीएल सामने जिंकण्यात धोनी १३३ सामन्यासह आघाडीवर आहे. ७० सामन्यात सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत अय्यरनं त्याची बरोबरी केलीये. आता फक्त रोहित शर्मा त्याच्या पुढे असून या हंगामातील दोन विजयासह तो एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे करू शकतो. 

आयपीएलमध्ये नेतृत्व करताना ७० सामन्यानंतर सर्वाधिक सामने जिंकणारे कर्णधार

  • ४३ : रोहित शर्मा 
  • ४१* : श्रेयस अय्यर 
  • ४१ : एमएस धोनी 
  • ३७ : विराट कोहली 
  • ३७ : गौतम गंभीर 
  • ३५ : डेविड वॉर्नर  

आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅचेस जिंकणारे कर्णधार  
 

  • १३३ - एमएस धोनी (२२६ सामने)
  • ८९ - रोहित शर्मा (१५८ सामने)
  • ७१ - गौतम गंभीर (१२९ सामने)
  • ६८ - विराट कोहली (१४३ सामने)
  • ४१* - श्रेयस अय्यर (७१ सामने)
  • ४० - डेविड वार्नर (८३ सामने)
     

टी-२० मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे भारतीय कर्णधार 

  • १८९ - एमएस धोनी (३२२ सामने)
  • १४० - रोहित शर्मा (२२५ सामने)
  • ९८ - गौतम गंभीर (१७० सामने)
  • ९६ - विराट कोहली (१९३ सामने)
  • ५१ - दिनेश कार्तिक (७७ सामने)
  • ५० - संजू सॅमसन (९३ सामने)
  • ५० - श्रेयस अय्यर (८४ सामने)*

Web Title: Shreyas Iyer Becomes 1st Player To Smash Fifty Plus Score For 3 Different Teams As Captain In IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.