Join us

स्टेडियममध्ये अनुष्का आणि रितिकामध्ये भांडण होतं का? रोहितच्या पत्नीचं भारी उत्तर

Rohit Sharma on The Great Indian Kapil Show: रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी मिश्किल टिप्पणी करून चाहत्यांचे मनोरंजन केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 16:07 IST

Open in App

Ritika Sajdeh And Anushka Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली. या दोन्ही स्टार खेळाडूंनी कपिल शर्मासोबत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी रोहितची पत्नी रितीका सजदेह देखील प्रेक्षक म्हणून उपस्थित होती. रोहित त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. इथे देखील त्याने मिश्किल टिप्पणी करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. रोहितच्या पत्नीला पाहून कपिल शर्माने तिला एक भन्नाट प्रश्न केला. 

कपिल शर्माने प्रश्न विचारला की, कधी रोहित लवकर बाद झाला आहे आणि त्यावरून अनुष्का शर्माने तुझी खिल्ली उडवली आहे का? यावरून दोघांमध्ये काही बिनसले आहे का? यावर उत्तर देताना रितीकाने सांगितले की, जेव्हा रोहित फलंदाजी करत असतो तेव्हा मी कोणाशीच बोलत नाही. त्यामुळे भांडण होण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. कपिल पुढे म्हणाला की, रोहित बाद झाल्यानंतर मग तू काय करतेस? तेव्हा रितीका सांगते की, ती इतर सहकाऱ्यांना चीअर करत असते. खरं तर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि रितीका सजदेह अनेकदा एकाचेळी टीम इंडियाला चीअर करताना दिसल्या आहेत. या दोघींमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. पण, रितीकाने तिच्या उत्तरातून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. 

दरम्यान, शोमध्ये रोहित शर्माने विश्वचषक २०२३ बद्दल देखील भाष्य केले आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर रोहितने भावनिक प्रतिक्रिया दिली. रोहित म्हणाला की, भारतीय संघाने विश्वचषकाच्या संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. पण अखेरच्या सामन्यात झालेल्या काही चुकांमुळे सामना हातून निसटला. आम्ही सामन्यापूर्वी दोन दिवस अहमदाबादला पोहोचलो होतो. आम्ही चांगला सराव केला होता. अंतिम सामन्यात शुबमन गिल लवकर बाद होऊनही आम्ही चांगली सुरुवात केली. मी आणि विराट कोहलीने डाव सावरला. मला वाटते की, आपण जेव्हा मोठ्या सामन्यांमध्ये धावा करतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघावर दडपण येते. १०० धावा असल्या तरी त्यांना त्याचा पाठलाग करायचा असतो. पण ऑस्ट्रेलियाने चांगले क्रिकेट खेळले. पण, पराभवानंतर आम्ही जिथे जिथे गेलो तिथे चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले. 

टॅग्स :रोहित शर्माश्रेयस अय्यरअनुष्का शर्माभारतीय क्रिकेट संघ