Shreyas Iyer And Ravi Bishnoi Added To Team India T20I Squad : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करण्याआधी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला दोन धक्के बसले. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यादरम्यान तिलक वर्माची अचानक तब्येत बिघडल्यावर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला. दुखापतीमुळे हे दोन खेळाडू टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकणार आहेत. परिणामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय टी-२० संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयने अधिकृत एक्स अकाउंटवरून यासंदर्भातील घोषणा केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रेयस अय्यरची दोन वर्षांनी टी-२० संघात एन्ट्री
तिलक वर्मा आणि वॉशिंग्ट सुंदर यांच्या जागी बीसीसीआयने दोन बदली खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यरला दोन वर्षांनी टी-२० संघात स्थान मिळाले आहे. पण न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या तीन टी-२० सामन्यासाठीच तो भारतीय संघाचा भाग असेल. याशिवाय रवी बिश्नोईला पुन्हा एकदा कमबॅकची संधी मिळाली आहे. तो वॉशिंग्टनच्या जागी संघात सामील झाला आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (पहिले 3 सामने), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उप कर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (विकेटकीपर), रवि बिश्नोई.
...तर टी-२० वर्ल्ड कप संघातही होऊ शकतो बदल?
न्यूझीलंडविरुद्धची टी मालिका T20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघाच्या तयारीचा भाग आहे. ७ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात वॉशिंग्ट सुंदरसह तिलक वर्माचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या बदलामुळे श्रेयस अय्यरला वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या संघात संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल. जर तिलक वर्मा फिट नसेल तर त्याची टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात वर्णी लागू शकते.
Web Summary : Injuries force changes in India's T20 squad before the World Cup. Shreyas Iyer returns for the New Zealand series, while Ravi Bishnoi replaces Washington Sundar. This series impacts World Cup team selection.
Web Summary : टी20 विश्व कप से पहले भारतीय टीम में चोटों के कारण बदलाव। श्रेयस अय्यर की न्यूजीलैंड श्रृंखला के लिए वापसी, रवि बिश्नोई वाशिंगटन सुंदर की जगह लेंगे। यह श्रृंखला विश्व कप टीम चयन को प्रभावित करती है।