Join us

ठरलं! श्रेया घोषालच्या सुरांची मैफील अन् चाहत्यांसाठी फक्त १०० रुपयांत मिळणार तिकीट

श्रेया घोषाल आणखी एका खास गोष्टीमुळे या जागतिक महिला क्रिकेट स्पर्धेशी कनेक्ट झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 13:20 IST

Open in App

Shreya Ghoshal To Perform At ICC Women’s Cricket World Cup 2025 Opening Ceremony : महिला वनडे वर्ल्ड कपमधील मोठ्या बक्षीसांची घोषणा केल्यावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासंदर्भातील खास माहिती शेअर केली आहे. लोकप्रिय भारतीय गायिका श्रेया घोषालच्या सुरांच्या सुरेल मैफीलीसह महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा माहोल खास करण्याचा बेत आखण्यात आला आहे. ३० सप्टेंबरला भारत-श्रीलंका यांच्यातील  लढतीसह महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होतीये. ही सलामीची लढत गुवाहटीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 श्रेया घोषाल अन् महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील तिचे खास कनेक्शन

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या लढतीआधी सुरेल आवाजातील गाण्यांच्या सादरीकरणाशिवाय श्रेया घोषाल आणखी एका खास गोष्टीमुळे या जागतिक महिला क्रिकेट स्पर्धेशी कनेक्ट झाली आहे. भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या स्पर्धेचे  'ब्रिंग इट होम' हे अधिकृत गाणेही श्रेया घोषालच्या आवाजात रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. 

रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट

श्रीलंकेच्या मैदानात खेळवण्यात येणार पाकिस्तान महिला संघाचे सामने 

यंदाच्या हंगामातील वनडे वर्ल्ड कप स्पर्धा ही भारताच्या यजमानपदाखाली होणार असली तरी भारत-पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीत ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान संघाचे सर्व सामने हे श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगतील. नवी मुंबईसह भारतातील चार शहरातील मैदानात या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. 

१२ वर्षांनी घरच्या मैदानात रंगतीये ही स्पर्धा, हरमनप्रीत कौर दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने उतरेल मैदानात

१२ वर्षांनी आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच यजमानपद भारताला मिळाले आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा दबदबा राहिला असून घरच्या मैदानात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारतीय महिला संघाला चीअर करण्यासाठी स्टेडियमवर जाऊन सामने पाहणाऱ्यांसाठीही एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे या जागतिक स्पर्धेतील भारतीय मैदानात रंगणाऱ्या सामन्यासाठी पहिल्या फेरीतील तिकटांचा दर हा फक्त १०० रुपये इतका आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी तिकीटांचा दर हा अल्प ठेवण्यात आलाय.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपश्रेया घोषालभारत विरुद्ध श्रीलंकाआयसीसीहरनमप्रीत कौर