रोहितला हटवलं याचं वाईट वाटतंय! किमान... हरभजन सिंगनं मांडलं रोखठोक मत

BCCI निवडकर्त्यांचा हा निर्णय भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग याला खटकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 22:55 IST2025-10-04T22:48:47+5:302025-10-04T22:55:08+5:30

whatsapp join usJoin us
Shocking For Me To See Rohit Sharma Not Named As ODI Captain Harbhajan Singh Reacts To Ajit Agarkar and Co’s Decision To Remove Hitman Captancy | रोहितला हटवलं याचं वाईट वाटतंय! किमान... हरभजन सिंगनं मांडलं रोखठोक मत

रोहितला हटवलं याचं वाईट वाटतंय! किमान... हरभजन सिंगनं मांडलं रोखठोक मत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Not ODI Captain Shocking To See Says Harbhajan Singh : अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या निवड समितीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून रोहित शर्मा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामना खेळायला सज्ज आहे. त्याला संघात स्थान मिळाले असले तरी त्याला कॅप्टन्सीवरून हटवण्यात आले आहे. कसोटीनंतर आता वनडे संघाचे नेतृत्वही शुबमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. BCCI निवडकर्त्यांचा हा निर्णय भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग याला खटकला आहे. शुबमन गिल हा चांगला पर्याय असला तरी त्याच्याकडे आणखी एक नवी जबाबदारी देण्याची ही योग्य वेळ नाही, असे सांगत किमान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तरी रोहित शर्माकडेच नेतृत्व असायला हवे होते, असे मत हरभजन सिंगनं मांडले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

शुबमन गिलचं अभिनंदनं; भज्जीला म्हणाला..
  
भारतीय वनडे संघातील खांदे पालट झाल्ल्याबद्दल भज्जी म्हणाला की, सर्वात आधी मी शुबमन गिलचे अभिनंदन करतो. त्याने कसोटीत चांगलं नेतृत्व केलं आहे. आता वनडेतही त्याला संधी मिळाली आहे. त्याच्यासाठी हे एक नवं आव्हान असेल.२०२७ चा वर्ल्ड कप अजून दूर आहे. त्यामुळे गिलला कर्णधारपद देण्यासाठी BCCI कडे काही महिन्यांचा वेळ होता. शुबमनसाठी मला आनंदच आहे, पण रोहितला हटवल्याचं वाईट वाटतं.

...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?

 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितकडेच कॅप्टन्सी असायला हवी होती
 
रोहित शर्मा हा व्हाइट क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. रोहित शर्माला कॅप्टन्सीवरून हटवल्याची बातमी आश्चर्यचकित करुन टाकणारी होती. जर तो ऑस्ट्रेलियात जाणारच होता, तर त्यानेच कर्णधार असायला हवे होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-२० वर्ल्ड कपसारख्या स्पर्धा जिंकल्या आहेत, यावरही  हरभजन सिंगनं भर दिला. रोहित हा भारतीय क्रिकेटमधील एक मजबूत स्तंभच आहे. किमान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तरी कॅप्टन्सी त्याच्याकडेच असायला हवी होती, असेही भज्जी म्हणाला आहे.

कसोटीत खेळणार असं सांगत निवृत्तीचा निर्णय घेतला, आता...

२०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर रोहित शर्मानं छोट्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. भारतीय संघासह रोहित शर्माच्या कसोटीतील फ्लॉप शोनंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगली. मी कुठेच जाणार नाही, असे म्हणत रोहित शर्मानं कसोटी आणि वनडेत खेळत राहणार असल्याचे स्पष्ट केले. पण इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी त्याने अचानक मोठ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. आता वनडेत त्याच्यावर शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळण्याची वेळ आली आहे.  

Web Title : रोहित को हटाना अनुचित, उसे नेतृत्व करना चाहिए था: हरभजन सिंह

Web Summary : हरभजन सिंह ने ऑस्ट्रेलिया दौरे के लिए रोहित शर्मा को कप्तानी से हटाने के बीसीसीआई के फैसले की आलोचना की। उनका मानना है कि शुभमन गिल प्रतिभाशाली हैं, लेकिन रोहित को टीम का नेतृत्व जारी रखना चाहिए था, खासकर उनकी पिछली सफलताओं के बाद।

Web Title : Unfair to remove Rohit, he should have led: Harbhajan Singh

Web Summary : Harbhajan Singh criticizes BCCI's decision to remove Rohit Sharma from captaincy for the Australia tour. He believes Shubman Gill is talented, but Rohit should have continued leading the team, especially after his past successes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.