अमेरिकेत सुरु असलेल्या मेजर लीग क्रिकेट २०२५ स्पर्धेतील १८ व्या सामन्यात सिएटल ऑर्कास विरुद्ध MI न्यूयॉर्क यांच्यातील सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाला. निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २३७ धावा करत सिएटल ऑर्काससमोर तगडे टार्गेट सेट केले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हेटमायरची हिरोगिरी; MI साठी पोलार्ड ठरला 'खलनायक'
या सामन्यात निकोलस पूरन याने ६० चेंडूत ७ चौकार आणि ८ उत्तुंग षटकाराच्या मदतीने १०८ धावांची धमाकेदार खेळी केली. याशिवाय तजिंदर ढिल्लो याने ३५ चेंडूत ८ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने ९५ धावा कुटल्या. धावांचा पाठलाग करताना हेटमायरनं आपली पॉवर दाखवली अन् मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघावर मोठी धावसंख्या करूनही पराभवाची नामुष्की ओढावली. पोलार्ड हा मुंबई इंडियन्ससाठी खलनायक ठरला.
वैभव सूर्यंवशीच्या फटकेबाजीसमोर फिकी ठरली फ्लिंटॉफच्या लेकाची फिफ्टी! युवा टीम इंडियाची विजयी सलामी
अखेरच्या चेंडूवर हव्या होत्या ६ धावा, मग हेटमायरनं पोलार्डला दाखवल आस्मान
हेटमायरच्या जीगरबाज खेळीच्या जोरावर मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही संघाला जे जमलं नव्हतं ते सिएटल ऑर्कासच्या संघाने करुन दाखवलं. २३७ धावांचा पाठलाग करताना अखेरच्या चेंडूवर संघाला विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती. आतापर्यंत या स्पर्धेत एवढी मोठी धावसंख्या कधीच कुणी पार केली नव्हती. पण हेटमारनं अखेरचं षटक घेऊन आलेल्या पोलार्डच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला अन् संघाला विक्रमी विजय मिळवून दिला.
अखेरच्या षटकातील थरार अन् पहिला विजय तोही एकदम दिमाखदार
मेजर लीग २०२५ स्पर्धेतील तिसऱ्या हंगामातील पहिल्या विजयासाठी सिएटल ऑर्कासला सहाव्या सामन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागली. एवढेच नाही तर या स्पर्धेतील सलग १० पराभवानंतर त्यांनी विजयाची चव चाखली. शिमरॉन हेटमायर याने या सामन्यात ४० चेंडूत ५ चौकार आणि ९ षटकाराच्या मदतीने नाबाद ९७ धावांची खेळी करत संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला.