Shikhar Dhawan Second Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज माजी फलंदाज आणि चाहत्यांचा लाडका 'गब्बर' म्हणजेच शिखर धवन पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. शिखर धवन त्याची गर्लफ्रेंड सोफी शाईन (Sophie Shine) हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिखर धवनचे पहिले लग्न आएशा मुखर्जीशी झाले होते. पण ११ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये घटस्फोट घेतला. आपल्या आयुष्यातील कठीण काळ मागे सोडून शिखर सोफीसोबत नव्या इनिंगला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे.
लग्न कधी होणार?
आता सुरु असलेल्या चर्चांनुसार, शिखर आणि सोफी दोघे फ्रेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार आहेत. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) परिसरात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा अत्यंत भव्य असेल, ज्यामध्ये क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आणि बॉलिवूडमधील नामांकित कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिखर स्वतः या लग्नाच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेत असून, त्याने हे लग्न खाजगी पण संस्मरणीय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोण आहे सोफी शाईन?
सोफी शाईन ही मूळची आयर्लंडची रहिवासी असून ती एक कॉर्पोरेट प्रोफेशनल आहे. तिने आयर्लंडमधील लिमेरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती 'शिखर धवन फाऊंडेशन'ची प्रमुख म्हणून काम पाहत असून ती 'द वन स्पोर्ट्स' (Da One Sports) या समूहात मुख्य कार्यकारी अधिकारी (COO) पदावर कार्यरत आहे.
कशी सुरू झाली प्रेमकहाणी?
शिखर आणि सोफीची पहिली भेट काही वर्षांपूर्वी दुबईतील एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या वर्षभरापासून ते 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये असल्याचे बोलले जात आहे. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान सोफी मैदानावर शिखरसोबत दिसल्यानंतर त्याच्या नात्याची चर्चा सार्वजनिक झाली होती. त्यानंतर मे २०२५ मध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली.