पंतप्रधानांनंतर गौतम गंभीरच...! शशी थरूर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर टीम इंडियाच्या कोचनं असा दिला रिप्लाय

शशी थरूर यांची खास पोस्ट अन् त्यावर गंभीरचा रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:56 IST2026-01-22T16:53:00+5:302026-01-22T16:56:14+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Shashi Tharoor Says Gautam Gambhir Has Hardest Job After PM India Coach Responds Goes Viral | पंतप्रधानांनंतर गौतम गंभीरच...! शशी थरूर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर टीम इंडियाच्या कोचनं असा दिला रिप्लाय

पंतप्रधानांनंतर गौतम गंभीरच...! शशी थरूर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर टीम इंडियाच्या कोचनं असा दिला रिप्लाय

कॉंग्रेस खासदार शशी थरूर हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. भारत-न्यूझीलंड यांच्यातील नागपूरच्या मैदानातील पहिल्या टी-२० सामन्यानंतर ते एका खास गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. शशी थरूर यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सामन्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याची भेट घेतली. त्याच्यासोबतचा खास फोटो शेअर करताना त्यांनी टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या जॉबसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. त्यावर गौतम गंभीरनंही रिप्लाय दिला असून ही गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

PM मोदींच्या नंतर गंभीरच! शशी थरूर यांची खास पोस्ट चर्चेत 

शशी थरूर यांनी एक्स अकाउंटवरून गौतम गंभीरसोबतचा एक खास फोटो शेअर केला होता. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत त्यांनी जुना मित्र गौतम गंभीर हा खंबीरपणे टीम इंडियाच्या कोचिंगची जबाबदारी सांभाळत आहे, असे म्हटले आहे. पंतप्रधानांनंतर भारतातील सर्वात कठीण काम गौतम गंभीर पाहत आहे, असा उल्लेख करत शशी थरूर यांनी गंभीरचे कौतुक केल्याचे दिसून येते. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

T20I Record : अर्शदीपचा ‘सिंग इज किंग’ अवतार! पाकच्या शाहीन आफ्रिदीला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन' गोलंदाज

गौतम गंभीर टीकाकारांकडे लक्ष न देता आपलं काम चोख बजावतोय  

काँग्रेसचे खासदार थरूर यांनी गंभीर यांच्यावर सातत्याने होणाऱ्या टीकेचाही उल्लेख केला आहे. दररोज लाखो लोक त्यांच्या निर्णयावर उलट सुलट चर्चा करत असतात. तरीही तो शांत राहतो आणि निर्धाराने पुढे जातो, असे म्हणत त्यांनी गौतम गंभीरच्या संयमी कोचिंगच कौतुक केले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा गाजवेल, असा विश्वासही थरूर यांनी आपल्या खास पोस्टमधून व्यक्त केला आहे. 

टीम इंडियाच्या कोचनं असा दिला रिप्लाय
  
शशी थरूर यांच्या पोस्टवर गौतम गंभीरनंही रिप्लाय दिला आहे. त्याने लिहिलंय की, "धन्यवाद डॉ. शशी थरूर. सगळा गोंधळ शांत झाल्यावर प्रशिक्षकाच्या कथित ‘अमर्याद अधिकारां’बाबत सत्य आणि तर्क स्पष्ट होईल. तोपर्यंत, माझ्याच सर्वोत्तम लोकांशी स्पर्धेत उभं केले जाणं मला फक्त मनोरंजक वाटतं!" अशा शब्दांत गौतम गंभीरनं याने एका अर्थाने आपल्याला अमर्याद अधिकार आहेत, यावरुन ट्रोल करणाऱ्यांना टोला लगावल्याचे दिसते. 
 

Web Title : पीएम के बाद गौतम गंभीर? शशि थरूर की टिप्पणी, कोच का जवाब।

Web Summary : शशि थरूर ने गौतम गंभीर की कोचिंग भूमिका की प्रशंसा की, इसे पीएम मोदी के बाद एक कठिन काम बताया। गंभीर ने जवाब देते हुए कोचिंग शक्तियों पर भविष्य में स्पष्टता का संकेत दिया, जो चल रही चर्चाओं और बहसों के बीच है। उन्हें अपने ही लोगों के खिलाफ खड़ा किया जाना मनोरंजक लगता है।

Web Title : Gautam Gambhir next after PM? Shashi Tharoor's comment and coach's reply.

Web Summary : Shashi Tharoor praised Gautam Gambhir's coaching role, comparing it to a tough job after PM Modi's. Gambhir responded, hinting at future clarity on coaching powers, amidst ongoing discussions and debates. He finds it amusing to be pitted against his own people.