Shardul Thakur engagement: भारतीय गोलंदाज शार्दूल ठाकूरचा पार पडला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी

Shardul Thakur engagement: भारतीय संघाचा गोलंदाज शार्दूल ठाकूर याचा आज सारखपुडा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 11:29 AM2021-11-29T11:29:37+5:302021-11-29T11:36:09+5:30

Shardul Thakur engagement: Indian pacer Shardul Thakur gets engaged with long-time girlfriend in Mumbai | Shardul Thakur engagement: भारतीय गोलंदाज शार्दूल ठाकूरचा पार पडला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी

Shardul Thakur engagement: भारतीय गोलंदाज शार्दूल ठाकूरचा पार पडला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे त्याची होणारी पत्नी

Next

Shardul Thakur engagement: भारतीय संघाचा गोलंदाज शार्दूल ठाकूर याचा आज सारखपुडा पार पडला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर शार्दूल ठाकूर विश्रांतीवर आहे आणि तो डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणं अपेक्षित आहे. शार्दूल त्याची प्रेयसी मित्ताली परुळकर  ( Mittali Parulkar) हिच्यासोबत साखरपुडा केला. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत. ३० वर्षीय शार्दूलला क्रिकेट करियरवर लक्ष केंद्रीत करायचे आहे आणि त्यामुळे तो पुढील वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर लग्न करणार आहे.  

''मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या BKC येथील हॉलमध्ये शार्दूल ठाकूरच्या साखरपुड्याचा छोटासा कार्यक्रम होणार आहे. त्यात त्यानं मित्र व  कुटुंबातील सदस्य अशा ७५ जणांनाच आमंत्रण दिले आहे.  पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो लग्न करणार आहे,''असे सूत्रांनी TOI ला सांगितले.

 

शार्दूल हा टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटमधील संघाचा सदस्य आहे. त्यानं ४ कसोटी, १५ वन डे व २४ -२० सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख गोलंदाज आहे. 

Web Title: Shardul Thakur engagement: Indian pacer Shardul Thakur gets engaged with long-time girlfriend in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app