Join us

Shane Warne accident: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न याच्या बाईकचा अपघात, झाली गंभीर दुखापत

Shane Warne accident: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचा बाईक अपघात झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:49 IST

Open in App

Shane Warne accident: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचा बाईक अपघात झाला आहे. मेलबर्न येथे  बाईकवरून प्रवास करताना हा अपघात झाला आणि यावेळी त्याच्यासोबत मुलगा जेसन हाही होता. या अपघातात त्याच्या नितंब, पाय व घोट्याला दुखापत झाली. ५२ वर्षीय वॉर्नला आणखी काही दुखापती झाल्या आहेत आणि पाय किंवा घोटा तुटल्याची भीती त्याला वाटतेय.

ऑस्ट्रेलियन मीडियाच्या वृत्तानुसार वॉर्नची बाईक घसरली आणि १५ मीटर फरफटत गेली. त्यानं लगेच उपचार घेण्यास नकार दिला, परंतु सोमवारी सकाळी तो हॉस्पिटलला गेला. त्याला वेदना होऊ लागल्या होत्या. ''माझ्या बाईकचा अपघात झाला, परंतु मी ठिक आहे, असे मला वाटले. मात्र, आज सकाळी मला हलताही येत नव्हते. त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलो. माझ्या घोट्याला वेदना होत आहेत, आशा करतो की तो मुका मार असेल. बाईक माझ्या पायावर पडली.  माझा पाय मोडला नसावा,''असे वॉर्न म्हणाला. वॉर्ननं १४५ कसोटी सामन्यांत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत.    

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाअपघात
Open in App